Festival Posters

लोकराजा राजर्षी शाहू महाराज

Webdunia
शनिवार, 6 मे 2017 (12:08 IST)
महाराष्ट्राने देशाला अनेक समाज सुधारक दिले, महात्मा फुलें पासून ते आंबेडकर, गाडगे महाराज, कर्मवीर असे अनेक. समतेची शिकवण देणारे शाहू महाराज हे लोकोत्तर पुरूष होते. समाजातल्या तळागाळातील लोकांना त्यांचा आधार वाटायचा. भारतात पहिल्यांदा सर्व समाजाच्या मुलांना शिक्षणाची आणी वसतिगृहाची सोय करून देणारे ते युगपुरूष होते. मुलीच्या शिक्षणालाही त्यांनी प्रोत्साहान दिले.
 
ते कर्ते सुधारक होते आपल्या राज्यातील फासेपारधी ,मातंग , गारूडी यांना त्यांनी आपल्या दरबारात नोकऱ्या दिल्या एवढे करून ते थांबले नाही तर अस्पृश्यांच्या शिक्षणाची सोय करून विकासाच्या प्रवाहात आणण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले.
 
एकदा पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधून त्याच्या अनावरणासाठी ब्रिटनचा सम्राट प्रिन्स आॅफ वेल्सला निमंत्रित करून पुण्यात आणले व महाराजांच्या पुतळ्याला सम्राटाला मुजरा करण्यास भाग पाडले असा हा पराक्रमी आणि मत्सुद्दी राजा होता. त्यांनी अनेक आंतरजातीय विवाह घडवून आणले. धनगर मराठा विवाह घडवून आपली उक्ती आणी कृती एकच आहे हे समाजाला दाखवून दिले.
 
ते कलासक्त होते आपल्या राज्यातील कलाकारांना ते राजाश्रय देत. एकदा नाटक पहातांना शिवाजी महारांजांच्या भूमिका करणाऱ्या तरूणाला त्यांनी लवून मुजरा केला. ते कुस्त्यांचे चाहते होते आजही कोल्हापूरात उत्तम मल्ल तयार होतात ती महाराजांनी दिलेली देणगी आहे.
 
राज्यातील शेतकरी शेतमजूरांची ते काळजी घेत. शेतकऱ्यांसाठी त्यांनी त्या काळात राधानगरी धरण बांधून शेतीविकासाला चालना दिली. शेतमाल खरेदी विक्रीसाठी त्यांनी मार्केट यार्ड तयार करून कोल्हापूरात एक बाजारपेठ निर्माण केली. त्यांनी विधवेच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहान दिले . कुलकर्ण्यांची वतने रद्द केली. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणारा हा पहिला राजा भारतातील राजा होता. आजही महाराजांच्या कार्याचा अलौकीक ठसा  कोल्हापूर परिसरात दिसून येतो. महाराज हे रयतेचे राजे होते. छत्रपतींचे वारसदार होते. एकदा जंगलात अस्वल त्यांच्या अंगावर आले असतांना त्यांनी त्याचा सक्षमपणे मुकाबला केला होते. 
 
एकदा व्हाईसरायने संस्थानिकांशी चर्चा करण्यासाठी देशातील सर्व संस्थानिकांना निमंत्रीत केले होते. त्यामध्ये महाराज आपल्या शरीरयष्टीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांचासारखा पराक्रमी प्रजेचे हीत पहाणारा साहित्य कला संस्कृतीची पाठराखण करणारा. समाजवादी समाजरचनेचा स्विकार करणारा राजा होणे नाही.
 
शेतकरी,कारागीर,कलाकार,विद्यार्थी गोर गरीब यांची ते काळजी घेत शेवटी दि. ६ मे १९२२ रोजी त्यांच निधन झाले त्यांच्या पवित्र स्मृतीस कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन..! 
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील १७ जागांसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला

सोलापूरमध्ये हॉटेलच्या खोलीत रील स्टार रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला; ३० जूनपूर्वी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दिली जाणार

नाशिक जिल्ह्यातील काश्यपी धरणात जोडपे आणि दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments