Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दरवर्षी बाथटबात बुडून हजारो मृत्यू

Webdunia
अभिनेत्री श्रीदेवींची दुबईच्या बाथटबात बुडून मृत्यू झाल्याने अनेक प्रश्नांचा जन्म झाला असून कोणालाही अशी मृत्यू येऊ शकते असे म्हटले जात आहे. तरीही लोकांना विश्वास बसत नाहीये की बाथटबात बुडून मृत्यू होऊ शकतो. ही गोष्ट अस्वा‍भाविक वाटत असली तरी अमेरिका आणि जपान येथे या प्रकाराची मृत्यू अगदी सामान्य आहे. अमेरिकेत तर दररोज एक तरी मृत्यू याकारणामुळे होत असते.
 
मार्च 2017 मध्ये जर्नल ऑफ जनरल अँड फॅमिली मेडिसिनमध्ये प्रकाशित एका अध्ययनात ही गोष्ट सांगितली गेली. याप्रमाणे जपानमध्ये दरवर्षी बाथटबमध्ये बुडून 19 हजार मृत्यूची नोंद होते. जपानची कंज्युमर अफेयर एजेंसीने एका वर्षापूर्वी एका रिपोर्टमध्ये म्हटले की मागील दहा वर्षात तिथष 70 टक्के लोकांची मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाली आहे. परंतू निधन झालेल्या 10 व्यक्तींमधून 9 लोकांचे वय 65 वर्षापेक्षा अधिक होते.
 
अध्ययनप्रमाणे जपानमध्ये बाथ टबमध्ये लोकं गरम पाणी वापरतात ज्याचा तापमान 40 आणि 41 डिग्री पर्यंत पोहचतो. हे नुकसानदायक असतं आणि जपान येथील बाथटब अधिक खोल असतात.
 
अमेरिकेच्या अटलांटा येथे सेंटर फॉर डिजिजेज कंट्रोलने 2015 साली जाहिर रिपोर्टमध्ये म्हटले होते की घरातील बाथरुम किती धोकादायक असू शकतं. रिपोर्टप्रमाणे 15 वर्षाहून अधिक वयाचे दोन लाख लोकं दरवर्षी बाथरुममध्ये जखमी होऊन हॉस्पिटलच्या इमरजेंसीत पोहचतात. अनेक प्रकरण अंघोळ करताना किंवा शॉवर घेतना घडतात. यातून महिला पीडितांची संख्या अधिक असते आणि त्यांचे शरीरातील खालील भाग अधिक जखमी असतात.
 
अमेरिकेच्या ग्रामीण क्षेत्रांमध्ये बाथटबमध्ये बुडण्यामुळे होणार्‍या मृत्यू राष्ट्रीय औसतहून तिप्पट असते. कॅलिफोर्निया, जिथे सर्वाधिक बाथ टब आहे, तिथे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. न्यूयॉर्कमध्ये बाथ टब कमी प्रमाणात असल्यामुळे मृत्यूदरही कमी आहे.
 
हार्वर्ड न्यूज रिपोर्टप्रमाणे पाच वर्षात तिथे 1676 अमेरिकी लोकांची मृत्यू बाथ टबमध्ये बुडल्यामुळे झाली आहे. अर्थात दरवर्षी सरासरी 335 मृत्यू. तसेच भारतात बाथरुममध्ये अपघाताचे आकडे नावाला असल्यामुळे अशी मृत्यू संशय पैदा करते आणि लोकं विचार करतात की लहानसे बाथटब मृत्यूचे कारण कसे असू शकतं.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments