Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भूमि अभिलेख विभाग सरळसेवा भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांना आवाहन

Webdunia
गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (08:50 IST)
भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहीत अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा विभागाच्या https://landrecordsrecruitment 2021.in व  https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर दि. 9 डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.
 
त्यानुसार दिनांक ३१ डिसेंबर २०२१ अखेर ऑनलाईन स्वरुपात स्विकारण्यात आलेल्या एकूण ७६३७९ अर्जाचा डाटा विभागाकडे प्राप्त झालेला आहे. या अर्जाची छाननी केल्यानंतर शैक्षणिक अर्हता धारण करीत नसलेल्या उमेदवारांनी अर्ज भरल्याचे दिसून आले. त्याचबरोबर एकाच विभागातून एकच अर्ज भरणे आवश्यक असताना काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे आढळले, तसेच छायाचित्र व स्वाक्षरी देखील चुकीच्या पद्धतीने अपलोड केल्याचे दिसून आले.
 
या कारणांस्तव विभागाने ऑनलाईन अर्ज स्विकृतीद्वारे प्राप्त अर्जामधुन अर्हता धारण करणारे व पात्र उमेदवार निवडीकरीता छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविणेचे ठरविले आहे. त्याबाबतच्या सविस्तर सूचना विभागाच्या https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.
 
छाननी अर्ज हे केवळ दि. 9 डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत अर्ज केलेल्या उमेदवारांनाच भरता येतील. या उमेदवारांनी आपले विहीत शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्याचे प्रमाणपत्र छाननी अर्जामध्ये अपलोड करावयाचे आहे. तसेच जे उमेदवार विहीत शैक्षणिक अर्हता धारण करणार नाहीत अशा उमेदवारांना परिक्षेस बसण्यास अपात्र ठरविण्यात येवून छाननी अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात योग्य ती माहिती भरल्यानंतर त्यांच्या अधिकृत बँक खात्यामध्ये भरलेल्या शुल्काचा परतावा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व उमेदवारांनी सहकार्य करावे अशी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अकबर-बिरबलची कहाणी : विहिरीचे पाणी

Tuesday Born Baby Girl Names मंगळवारी जन्मलेल्या मुलींसाठी शुभ नावे

Tuesday Born Baby Boy Names मंगळवारी जन्मलेल्या मुलांसाठी शुभ नावे

हिवाळा विशेष : चिकन सूप बनवण्याची सोप्पी पद्धत

वाट पाहणारं दार

पुढील लेख
Show comments