Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारी नोकरी : आयटीआय उत्तीर्ण तरुणांसाठी एक उत्तम संधी, 547 पदांवर येथे भरती सुरू अर्ज करा

Webdunia
बुधवार, 27 जानेवारी 2021 (08:40 IST)
आयटीआय करून सुद्धा आपण बेरोजगार आहात किंवा आपल्या कंपनी किंवा नोकरीला बदलून सरकारी नोकरी मिळवू इच्छिता तर आयटीआय ते सिव्हिल,मॅकेनिकल आणि आर्किटेक्चर मधील डिप्लोमा धारकांना ही उत्तम संधी आहे. ही संधी पंजाब येथे मिळणार आहे. येथे 547 पदांवर आयटीआय डिप्लोमा धारकांसाठी भरती केली जात आहे.
पंजाब अधीनस्थ सेवा निवड मंडळ म्हणजे पंजाब सबॉर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाने (पीएसएसएसबी) ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर आयटीआय ते सिव्हिल, मॅकेनिकल आणि आर्किटेक्चर मध्ये डिप्लोमा धारक ते ज्युनिअर ड्राफ्ट्समन च्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 11 फेब्रुवारी 2021किंवा या पूर्वी या sssb.punjab.gov.in संकेत स्थळावर या पदांसाठी अर्ज करू शकतात. नोंदणी फी जमा करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे.
 
पंजाब सब-ऑर्डिनेट सिलेक्शन बोर्ड द्वारे 547 रिक्त पदांच्या भरतीसाठी मोहीम राबविली जात आहे, या मध्ये 529 पदे सिव्हिलसाठी,13 पदे मॅकेनिकल साठी आणि 5 पद आर्किटेक्चर शाखेतून डिप्लोमा धारकांसाठी आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर क्लिक करून थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
 
शैक्षणिक पात्रता-
सिव्हिल -उमेदवारांना इयत्ता 10वी उत्तीर्ण असले पाहिजे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थान(आयटीआय) मधून सिव्हिल मध्ये ड्राफ्ट्समनचे  2 वर्षाचे प्रमाणपत्र असले पाहिजे. 
 
मॅकेनिकल - उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थान(आयटीआय) मधून मॅकेनिकल मध्ये ड्राफ्ट्समनचे  2 वर्षाचे प्रमाणपत्र असावे.
 
आर्किटेक्चर - उमेदवार राज्य तंत्र शिक्षण मंडळ किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून आर्किटेक्चरल असिस्टंटशिप मध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ब्युटी सिक्रेट्स: या सोप्या पद्धतीने काही मिनिटांत घरच्या घरी चमकणारी त्वचा मिळवा

महिलांनी स्तनपान करताना ब्रा घालणे योग्य आहे की नाही?जाणून घ्या

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार

पुढील लेख
Show comments