Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एसबीआयकडून बँक मित्रांचा शोध, रोजगाराची मोठी संधी

Webdunia
बुधवार, 11 जुलै 2018 (16:27 IST)
एसबीआय बँकेकडून बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची संधी उपबल्ध करुन देण्यात येत आहे. एसबीआयने देशातील 8 राज्यांमध्ये एसबीआय बँक मित्रांचा शोध सुरू केला आहे. या पदासाठी निवड झाल्यानंतर मासिक वेतनासह कमिशनही मिळणार आहे.
 
देशातील ग्रामीण भागात आपली सेवा पोहोचविण्यासाठी एसबीआयने 'बँक मित्र' नावाने जागा भरण्यास सुरुवात केली आहे. बिझनेस करस्पाँडन्टप्रमाणे हे एसबीआय मित्र आपले काम करतील. ग्राहकांचे बँकेत खाते उघडून देणे, पैसे जमा करणे, बँकेतून पैसे काढणे यांसारखी कामे बँक मित्रांद्वारे करण्यात येतील. यासोबतच इतर आर्थिक योजनांचीही माहिती ग्राहकांना देतील, त्यामुळे ग्राहकांना गुंतवणूक करणे सोपे होणार आहे. देशात सध्या 1.25 लाख बँक मित्र आहेत. बँकेकडून त्यांना दोन हजार ते 5 हजार रुपयांपर्यंतचा पगार देण्यात येतो. त्यासह प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर कमिशनही मिळते. 
 
* रिक्त पदे - 
बँक मित्र पदासाठी उत्तर प्रदेशमध्ये 43, महाराष्ट्रात 261, बिहारमध्ये 18, दिल्लीत 120, छत्तीसगडमध्ये 24, आसाममध्ये 64, अरुणाचल प्रदेशमध्ये 15 आणि आंध्र प्रदेशमध्ये 16 जागांवर ही भरती करण्यात येत आहे.  
 
* पात्रता - 
बँक मित्र पदासाठी उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. या पदसाठी निवृत्त बँक कर्मचारी, निवृत्त शिक्षक, सैन्यातील निवृत्त व्यक्ती, निवृत्त सरकारी कर्मचारी, किराणा किंवा मेडिकल दुकानाचे मालिक, सरकारी स्‍मॉल सेविंग्‍स स्‍कीम्‍स किंवा इन्शुरन्स कंपनींचे प्रतिनिधी, पेट्रोल पंप मालक, निवृत्त पोस्‍ट मास्‍टर, NGO इत्यादी सहभागी आहेत. 
 
* बँक मित्र बनण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -
ओळखपत्र पुरावा (सरकारी मान्यता प्राप्त कार्ड)
रहिवाशी दाखला (वीज बिल, टेलिफोन बिल)
10वीचे गुणपत्रक
कॅरेक्टर सर्टिफिकेट (पोलिसांकडून तपासणी झालेले)
बँक अकाऊंट डिटेल्स, पासबुक, चेकबुक.
दोन पासपोर्ट साइज फोटो.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments