Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; 25,271 कॉन्स्टेबल (GD) पदांची बंपर भरती

SSC GD Constable Recruitment 2021
Webdunia
सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (11:42 IST)
प्रदीर्घ काळापासून एसएससी जीडी कांस्टेबल भरती परीक्षेच्या नोटिफिकेशनची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने जीडी कॉंस्टेबलच्या एकूण २५ हजारहून अधिक पदांवरील भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. नोटिफिकेश २०२१ नुसार केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ), एनआयए, एसएसएफमध्ये कॉंस्टेबल पदाच्या एकूण २५ हजार २७१ जागांसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत.
 
कर्मचारी निवड आयोग अंतर्गत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या एकूण 25,271 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे. हि माहीत सर्वात तत्पर आम्ही महाभरती वर प्रकाशित करत आहोत. इच्छुक आणि पात्र उमेदवार सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), इंडो तिबेट सीमा पोलिस (ITBP), साशास्त्र सीमा बाल (SSB) या भरती साठी पात्र असतील. अर्ज प्रक्रिया 17 जुलै 2021 रोजी सुरू होईल.
 
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२१ आहे. तसेच ऑनलाइन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर आणि चलान फी जमा करण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर आहे.
 
जीडी कॉन्स्टेबल पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवाराने दहावी परीक्षा पास असणे गरजेचे आहे. ज्या उमेदवारांकडे पात्रता प्रमाणपत्र आहे किंवा जे १ ऑगस्ट २०२१ च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत तेच उमेदवार अर्ज करु शकतात. एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षा २०२१ ची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. तर निवड केल्या गेलेल्या उमेदवारांना पे लेव्हल ३ प्रमाणे २१, ७०० ते ६९,१०० पर्यंत पगार देण्यात येणार आहे.
 
पदाचे नाव– कॉन्स्टेबल (GD)
पद संख्या – 25,271 जागा
शैक्षणिक पात्रता– 10th Pass
वयोमर्यादा – 18 ते 23 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 जुलै 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021
अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in
 
निवड प्रक्रिया आणि परीक्षा कशी असेल ? 
सर्वप्रथम संगणक आधारित लेखी परीक्षा असेल.
लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी बोलवले जाईल.
लेखी परीक्षेत जनरल इंटेलिजन्स Reण्ड रीझनिंग, जनरल नॉलेज अँड जनरल अवेयरनेस, एलिमेंटरी मॅथ्स आणि इंग्लिश / हिंदी विषयांशी संबंधित प्रश्न विचारले जातील.
 
पगार
21700- 69100
 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

हे 5 केसांचे तेल सुंदर आणि निरोगी केसांचे शत्रू आहेत, वापरणे टाळा

Good Friday Special Recipe फिश करी

कांद्यावर काळे डाग असणे म्हणजे काय? याचा कधी विचार केला आहे का? जाणून घ्या

उन्हाळा विशेष थंडगार Pineapple juice

World Earth Day Essay 2025 in Marathi जागतिक वसुंधरा दिन निबंध मराठीत

पुढील लेख
Show comments