Festival Posters

ट्रान्सपरंट कुर्तिजची फॅशन पतरली...

Webdunia
बुधवार, 3 जुलै 2019 (11:45 IST)
सध्या तरुणी फॅशनेबल राहणे पसंत करतात. त्याचबरोबर त्या फॅशनेबल कपडेही घालतात. मग ते एखाद्या तरुणीने दुसर्‍या तरुणीच्या अंगावर घातलेले पाहिले की, तिलाही तसे कपडे घालण्याची आवड निर्माण होते. मग तिची ती आवड तिच्या लूकला सूट करो अथवा ना करो ती तरुणी ते कपडे घालते. सध्या बदलत्या फॅशननुसार लोकही बदलत असतात. तेही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे त्या त्या ऋतूमधले कपडे घालतात.
 
पहिले अन्न-वस्त्र-निवारा या लोकांच्या गरजा मानल्या जात असत, मात्र आता बदलत्या ऋतूनुसार बदलणे ही गरज आहे. आता बाजारात चलती आहे ती चायना जीन्स व त्यांवर वेअर केलेल्या ट्रान्सपरंट टॉपची. या टॉपमधून इनर घातले जाते. इनरची किंमत 50 पासून 200 रुपयांपर्यंत असते. तर या टॉपची किंमत 150 ते 400 रुपयांपर्यंत असते. ही फॅशन सर्वसाधारण लोकांच्या खिशाला परवडणारी आहे. या टॉपचा फायदा उन्हाळ्यात व पावसाळ्यात खूप होतो.
 
उन्हाळ्यात घातले की गरम होत नाही व पावसाळ्यात घातले की लवकर सुकते. त्या जीन्स व टॉपवर तरुणी डिझाईनर लॉकेट वेअर करतात. हातात प्रिंटेड बांगड्या व कानामध्ये मोठय़ा साईजचे कानातले सिल्वर किंवा गोल्डमध्ये घालतात. या टॉपमध्ये निळा, गुलाबी, पांढरा, काळा अशा रंगांना जास्त मागणी आहे. पण एक मात्र खरं बदलत्या काळानुसार आपले राहणीमान बदलत राहावे ही चांगली सवय आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात अति थंड हात असणे या आजाराचे लक्षण असू शकतात

रिलेशनशिप मध्ये क्लिअर कोडिंग ट्रेंड म्हणजे काय

नैतिक कथा : हुशार ससा

Saturday Born Baby Girl Names शनिवारी जन्मलेल्या मुलींसाठी नावे

शिंगाडयांची लागवड करतांना शेतकरी त्यांच्या शरीरावर इंजिन ऑइल का लावतात? माहिती आहे का तुम्हाला?

पुढील लेख
Show comments