rashifal-2026

येळकोट येळकोट जय मल्हार

Webdunia
मार्गशीर्ष महिन्यात येणारे हे नवरात्र देवीच्या नवरात्रासारखेच असते. श्रीमहादेवाच्या मल्हारी मार्तंड हा एक अवतार होय. 
 
पुण्याजवळ असलेले जेजुरी ह्या गावी मल्हारी देवस्थान आहे. 
कृतयुगात मणी व मल्ल या राक्षसांना ब्रह्म देवाने, ``तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही'' हा वर दिला त्यामुळे ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले व ऋषीमुनी करीत असलेल्या तपश्चर्येला अडथळा आणून तेथे विध्वंस करू लागले. ऋषीमुनींनी अखेर कंटाळून देवांकडे मदत मागितली. 
 
भगवान शंकर त्यांचे म्हणणे ऐकून संतप्त झाले. त्यांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपल्या ७ कोटी (येळकोट) सैन्य घेऊन व कार्तिकेयासह ते मणि मल्ल राक्षसांवर चालून गेले. दोन्ही पक्षात प्रचंड युध्द होऊन अखेर मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाला त्याची छाती फोडून त्याला जमिनदोस्त केले. मणी राक्षसाने शरण येऊन ``माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे'' अशी इच्छा व्यक्त केली. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले. 
 
नंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा पराभव केला तेव्हा त्याचे शरण जाऊन ``तुमच्या नांवाआधी माझे नांव जोडले जावे अशी मागणी केली.'' तथास्तु म्हणून मार्तंड भैरवाने मान्य केले. तेंव्हापासून त्यांना मल्हारी (मल्ल+अरी) मार्तंड असे म्हणण्यात येते. 
 
हा विशेषत: धनगराचा देव मानला जातो. अतिशय जागृत देव आहे. मुख्य भंडारा म्हणून हळद उधळली जाते; ज्वारीचा रोडगा व भरीत हा त्यांचा प्रसाद असतो.
सर्व पहा

नवीन

Makar Sankranti Aarti Marathi मकर संक्रांत आरती

Makar Sankranti Ukhane for Husband पुरुषांसाठी खास संक्रांती उखाणे, बायकोला इम्प्रेस करा!

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

मकर संक्राती आणि एकादशी एकाच दिवशी ... काय करावे?

Ardhanari Nateshvara Stotram अर्धनारी नटेश्वर स्तोत्रम्

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments