हिंदू पंचांगानुसार होळी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केली जाते. दोन दिवस साजरा केल्या जाणार्या या सणात पहिल्या दिवशी होलिका दहन तर दुसर्या दिवशी घूलिवंदन अर्थात होळी खेळतात. तसेच होळी जीवनातील काही संकटांवर मात करण्यासाठी श्रेष्ठ सण असल्याचे मानले गेले आहे. या दरम्यान काही ज्योतिष उपाय करून संकटांना मात करता येतं. तर जाणून घ्या कोणत्या समस्यांसाठी कोणते उपाय योग्य ठरतील.
1. धनाची कमी
होळीच्या रात्री चंद्र उदय झाल्यानंतर आपल्या घराच्या गच्चीवर किंवा खुल्या मैदानात जिथून चंद्र दिसत असेल तेथे उभे राहावे. नंतर चंद्राला स्मरण करत चांदीच्या ताटात खारीक आणि मकाने ठेवून शुद्ध तुपाच्या दिव्यासह धूप आणि उदबत्ती दाखवावे. आता दुधाने चंद्राला अर्घ्य द्यावे.
अर्घ्य दिल्यानंतर पांढरी आणि केशर मिश्रित साबुदाण्याची खीर अर्पित करावे. समृद्धी प्रदान करण्यासाठी प्रार्थना करावी. नंतर प्रसाद आणि मकाने मुलांमध्ये वाटून द्यावे. नंतर येणार्या प्रत्येक पौर्णिमेला रात्री चंद्राला दुधाने अर्घ्य द्यावे. काही दिवसातच आर्थिक संकट दूर होत असल्याची जाणीव होईल.
2. ग्रहांच्या शांतीसाठी
होळीच्या रात्री उत्तर दिशेत चौरंगावर पांढरा कपडा पसरवून त्यावर मूग, चण्याची डाळ, तांदूळ, काळे उडीद आणि तिळाचे ढिग तयार करावे. आता त्यावर नवग्रह यंत्र स्थापित करावे. त्यावर केशराने तिलक करावे, तुपाचा दिवा लावावा आणि या मंत्राचा जप करावा. जपण्यासाठी स्फटिक माळ घ्यावी. जप पूर्ण झाल्यावर यंत्र पूजा स्थळी स्थापित करावे, याने ग्रह अनुकूल होतील.
एकाक्षी नारळ लाल कपड्यात गव्हाच्या आसनावर स्थापित करावे आणि सिंदुराने तिलक करावे. आता कोरलच्या माळीने या मंत्राचा जप करावे. 21 माळ जप केल्यावर ही पोटली दुकानात ग्राहकांनी नजर पडेल अशा ठिकाणी लटकवावी. याने व्यवसायात यश प्राप्तीचे योग वाढतात.
मंत्र- ॐ श्रीं श्रीं श्रीं परम सिद्धी व्यापार वृद्धी नम:।
4. शीघ्र विवाहासाठी उपाय
होळीच्या दिवशी सकाळी एक साबूत विड्यावर साबूत सुपारी आणि हळदीची गाठ घेऊन शिवलिंगावर अर्पित करावी नंतर मागे न वळता घरी यावे. हा उपाय दुसर्या दिवशी पण करावा. विवाहाचे योग जुळून येतील.
5. आजार दूर करण्यासाठी
आपण आजारामुळे त्रस्त झाला असाल तर होळीच्या रात्री हा खास उपाय आपल्याला आजारापासून मुक्ती देऊ शकतो. होळीच्या रात्री या मंत्राचा तुळस माळीने जप करावा.