rashifal-2026

शनी अर्थात लोकशाही परंपरेचा प्रतिनिधी

Webdunia
शनिवार, 5 जानेवारी 2019 (11:30 IST)
सूर्यमंडलात सर्वांत सुंदर ग्रह शनी आहे. आपल्या वलयाकार आकृतीमुळे इतर ग्रहांपेक्षा त्याची वेगळी ओळख आहे. हा ग्रह सूर्य आणि पृथ्वीपेक्षा सर्वांत लांब असून त्याला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी जवळपास 29 वर्ष सहा महिने लागतात. शनी सूर्य आणि त्याची दुसरी बायको छाया यांचा मुलगा आहे. हा ग्रह का दशम किंवा एकादश भागचा प्रतिनिधीत्व करतो. शनी हा कर्म, सत्ता आणि उत्पन्नाचा प्रतिनिधी असल्यामुळे जीवनात युवावस्थेपासून वृध्दावस्थेपर्यंत प्रभाव टाकतो. या ग्रहास पापी ग्रहाची संज्ञा ज्योतिषशास्त्रात दिली गेली आहे. तो तुळ राशीस उच्च व मेष राशीत नीच फळ देतो.
 
शनी ज्या भावाने राशीत विराजमान असतो, त्या भावाने तिसर्‍या, सातव्या आणि दहाव्या स्थानावर प्रभाव टाकतो. शनी ज्या राशीत भ्रमण करतो त्याच्या पुढच्या किंवा मागच्या राशीत साडेसातीच्या रुपाने प्रभाव टाकतो. शनी अशुभ असल्यास वात, कफ, विकलांगता, मानसिक विकार, पोलिओ, कर्करोग, हार्निया आदी रोगांना कारक ठरतो. वधूवरांपैकी एकाची कुंडली मंगळाची असल्यास शनीच्या सहाय्याने मंगळ दोषांचे निवारण केले जाऊ शकते.
 
सार्वजनिक जीवनात शनीला लोकशाही परंपरेचा प्रतिनिधी समजले गेले आहे. यामुळे राजकारणात यश किंवा अपयशासाठी शनी ग्रहाला महत्व आहे. शनीमुळेच वय, मृत्यू, चोरी, नुकसान, खटला, कैद, शत्रू याबाबत माहिती मिळू शकते. 
 
मेष लग्नात शनी सातव्या, दहाव्या आणि अकराव्या स्‍थानावर शुभ असतो. परंतु, प्रथम भावात अत्यंत अशुभ असतो. शनीच्या अशुभ फळापासून वाचण्यासाठी खालील उपाय करु शकता. ‍
 
तीळ किंवा दुसर्‍या कोणत्याही तेलाने मॉलिश करून काळे तीळ, बडीशोप यांना पाण्यात मिसळून आंघोळ करावी. त्यामुळे अनिष्ट प्रभावापासून शांती मिळते. लोखंड, काळे कपडे, बडीशोप, काळे तीळ, चामडे, ‍‍‍‍निळे फुल यांचे दान करावे. शनीच्या कोपापासून वाचण्यासाठी शनी मंत्राचा जप करावा. 
 
ॐ शं शनैश्वराय नम:किंवा शनीच्या अन्य मंत्राचाही जप करू शकता. शनी यंत्राचेही यथासंभव दान करावे.शनी ग्रहाच्या पूर्ण शांतीसाठी पूजा-पाठ केल्यानंतर अशुभ प्रभाव शुभ प्रभावात रुपांतरीत हतोते. यासाठी हवनसुध्दा केले पाहिजे. तसेच शनिवारचे व्रतही करावे. शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळील हनुमान मंदिर किंवा शिव मंदिरात जावून दिवा लावावा.
 
शनी ग्रह काळ्या रंगाच्या पशु-पक्ष्यांचे प्रतिनिधीत्व करीत असल्यामुळे त्यांची सेवा करावी. त्यांना सुखमय भोजन द्यावे. व्यसनांपासून दूर राहावे. छळ, कपट, खोटी साक्ष यापासून लांब रहावे. सामसुम असलेल्या किंवा निर्जन ठिकाणी जाणे टाळावे. तसेच अंधारापासून लांब रहावे. वडिलधार्‍या व्यक्तींचा मान ठेवावा. शनी अशुभ असल्यास शनीच्या वस्तुंचे दान करावे. शनी शुभ असल्यास शनीचे वस्तूंचे दान करू नये. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मकर संक्रातीला झटपट घरी बनवा तिळाच्या मऊ वड्या TilGul Vadi Recipe

Budhwar Upay बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा

Makar Sankranti 2026 Wishes in Marathi मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

आरती बुधवारची

बुधवारी काय करावं आणि काय नाही हे जाणून घेउ या

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments