Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी केला जातोय शरीराच्या गंधाचा वापर, पण कसा?

Webdunia
सोमवार, 27 मार्च 2023 (14:20 IST)
स्वीडिश संशोधकांच्या मते, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी इतर लोकांच्या शरीराचं गंध हुंगणे अर्थात एखाद्याच्या शरीराचा वास घेणे उपचारासारखं आहे. संशोधकांनी स्वयंसेवकांवर याची टेस्ट घ्यायला सुरुवात केली आहे. या प्रयोगामध्ये संशोधकांनी लोकांच्या काखेतील घामाचा वापर केला.
 
या गंधामुळे त्यांच्या भावनेवर आधारलेल्या कल्पनांचे मेंदूतील मार्ग मोकळे होतात आणि यातून त्यांच्या मनाला शांती मिळते. पण हे अनुभव योग्य आहेत की नाही हे आत्ताच सांगणं कठीण आहे.
 
या आठवड्यात पॅरिसमध्ये होऊ घातलेल्या मेडिकल कॉन्फरन्स मध्ये ते त्यांचे निष्कर्ष सादर करणार आहेत.
आपल्याला वास का आणि कसा येतो?
लहान मुलं जन्माला येतानाच त्यांची घाणेंद्रिये तीव्र असतात. त्यामुळे त्यांना त्याच्या आईची आणि आईच्या दुधाची जाणीव होते.
 
थोडक्यात वासामुळे, गंधामुळे आपल्याला धोक्यांची जाणीव होत असते. जसं की, अन्नाचा गंध, धुराचा आगीचा गंध. यातून आपण वातावरणाशी तसेच एकमेकांशी संवाद साधतो.
 
या गंधातूनच जेवण चवदार बनल्याचं समजतं, शिवाय यातून आपल्या जुन्या आठवणी ताज्या होतात.
 
आपल्या नाकाच्या वरच्या भागात असलेल्या रिसेप्टर्समुळे आपल्याला गंधाची जाणीव होते. आपल्या मेंदूमध्ये आठवणी आणि भावनांशी संबंधित एक भाग असतो, त्याला लिंबिक सिस्टीम म्हणतात. हे सिग्नल थेट त्या लिंबिक सिस्टीममध्ये पोहोचविले जातात.
 
मानवी शरीराचा गंध भावनिक स्थितीशी संवाद साधू शकतो असं स्वीडिश संशोधकांना वाटतं. आणि इतरही भावनिक स्थितीबद्दल आपल्याला गंधातून कल्पना येऊ शकते.
 
संशोधकांनी या प्रयोगासाठी काही स्वयंसेवकांची निवड केली. या स्वयंसेवकांना भितीदायक चित्रपट किंवा आनंदी चित्रपट पाहून काखेतील घाम देण्यास सांगितला.
त्यानंतर मानसिक तणाव असलेल्या 48 महिलांनी हा घाम हुंगण्यास सहमती दर्शविली, सोबतच माइंडफुलनेस नावाची थेरपी घेतली. या थेरेपीत लोकांना नकारात्मक विचार करण्याऐवजी वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केलं जातं.
 
या प्रयोगात सहभागी झालेल्या काही महिलांना शरीराच्या घामाचा वास घ्यायला लावला. तर काही महिलांना शुद्ध हवा देण्यात आली.
 
ज्यांनी घामाचा दर्प घेतला त्यांना थेरेपीमुळे आणखीन बरं वाटलं.
 
स्टॉकहोममधील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या प्रमुख संशोधक श्रीमती एलिसा विग्ना सांगतात की, "जो व्यक्ती आनंदी चित्रपट पाहत होता त्याच्या घामाच्या दर्पामुळे दुसरा व्यक्ती आनंदी झाला, अगदी तसंच भीतीदायक चित्रपटांविषयी घडलं. त्यामुळे मानवी घामातील केमो-सिग्नलमध्ये अशी काहीतरी गोष्ट असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उपचारांवर परिणाम होतो.
 
"एखाद्याच्या उपस्थितीमुळे हा परिणाम घडल्याचं प्रत्यक्षदर्शी वाटू शकतं पण याची खातरजमा करणं आवश्यक आहे. खरं तर, आम्ही आता हाच फॉलो-अप स्टडी करत आहोत. यात आम्ही भावनाविरहित माहितीपट पाहणाऱ्या व्यक्तींच्या घामाचाही समावेश केलाय."
 
घाम म्हणजे काय आणि त्याचा नेहमीच वास येतो का?
तर बहुतेक वेळा घाम गंधहीन असतो. पण काखेत आणि मांडीच्या सांध्यांमधी घर्मग्रंथी काही संयुगे तयार करतात ज्यामुळे शरीराला दुर्गंधी सुटते.
 
आपल्या त्वचेच्या पृष्ठभागावर किंवा केसांच्या फॉलीकल्सवर काही बॅक्टेरिया असतात. ते या संयुगांमध्ये बदल करतात ज्यामुळे आपल्या घामाला दर्प येतो.
 
वास आणि चवीच्या विकारांबद्दल जागरूकता वाढवण्याचं काम करणारे चॅरिटी फिफ्थ सेन्सचे डंकन बोक सांगतात, "गंध आणि आपल्या भावनिक जडणघडणीमध्ये मजबूत संबंध असतात.
 
"जर तुम्ही वास घेण्याची क्षमता गमावली तर तुम्हाला नैराश्य आणि एकटेपणाची भावना येऊ शकते. जसं की, तुम्ही तुमच्या जोडीदार आणि मुलांचा वास ओळखू शकत नसाल, तर अशा गोष्टी घडण्याची शक्यता असते."
 
"हा एक प्राथमिक अभ्यास असून यावर आणखीन संशोधनाची गरज आहे. पण चांगल्या मानसिक आरोग्यासाठी गंध नेमका कसा काम करतो याविषयी आणखीन माहिती जाणून घेणं खूप उत्साहवर्धक आहे."
 
Published By- Priya Dixit 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments