Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केवळ लाइफस्टाइलमध्ये बदल करून आपण मेंदूचं वय कमी करू शकतो का?

Webdunia
शनिवार, 13 जुलै 2024 (14:10 IST)
आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये जीवनशैलीचा वाटा मोठा असतो, ही आता नवीन माहिती नाहीये.
 
आपण जीवनशैलीच्या मदतीने मेंदूचे वय वाढण्याची प्रकिया पुढे ढकलू शकतो का, या प्रश्नाचा पाठपुरावा करताना शास्त्रज्ञ दिसत आहेत.
 
ही प्रक्रिया कशी काम करते याचा अभ्यास करून ते सिद्ध करता येईल का याचा ते अभ्यास करत आहेत.
 
ब्लू झोन म्हणजे काय? तेथील लोकांची लोकांची जीवनशैली कशी आहे?
लॉस एंजल्सच्या पूर्वेला असलेले लोमा लिंडा हे शहर जगातील ब्लू झोन म्हणून ओळखले जाते. कारण इथल्या लोकांचे आयुष्य हे इतरांपेक्षा थोडे दीर्घ आहे.
 
या शहरातील लोक शक्यतो अल्कोहोल आणि कॅफिनचा वापर प्रामुख्याने टाळतात. त्यामागची त्यांची धारणा ही धार्मिक आहे आणि धर्मानुसार शरीरासाठी योग्य गोष्टी करणं हे आपलं कर्तव्य असल्याची त्यांची धारणा आहे.
 
याला ते 'हेल्थ मेसेज' म्हणतात आणि त्यामुळे त्यांनी जगाच्या नकाशावर ठळकपणे त्यांनी 'ब्लू झोन'मध्ये आपली जागा मिळवली आहे.
 
या शहरात आयुष्य वाढविण्याच्या प्रक्रियेवर अनेक दशकांपासून खूप रिसर्च केला गेला आहे.
 
लारा लिविंग्टन यांना मर्जीके आणि तिचा पती टॉम यांना नाश्त्यासाठी लोमा लिंडा येथे त्यांच्या घरी बोलावले.
 
तिथे नाश्त्यात ओटमील, सब्जाच्या बिया आणि इतर काही पदार्थ होते. पण त्यांपैकी कशातही प्रक्रियायुक्त साखरेचा समावेश नव्हता. कॉफीमध्येही साखरेचा समावेश नव्हता.
 
अगदी लोमा लिंडामधील पद्धतीप्रमाणेच हा आदर्श नाश्ता होता. हाच आहार तिथल्या लोकांचे आयुर्मान वाढविण्यास मदत करत असल्याचं त्यांना वाटतं.
 
लोमा लिंडा इथं 'सेवन्थ डे' ही कम्युनिटी प्रामुख्याने वास्तव्यास आहे.
 
मर्जीके आणि तीचा पती टॉम हे ह्या शहरात बऱ्यापैकी नंतर आले. ते ह्या कम्युनिटीचा भाग नव्हते. मात्र, आता ते येथील जीवनशैलीशी एकरूप झालेले आहेत.
 
लोमा लिंडामध्ये विशेष असे काही रहस्य नाहीये, पण इथले नागरिक शारीरिक आणि मानसिकरित्या जास्तीत जास्त सुदृढ कसे राहता येईल याचा विचार करतात. शिवाय धर्म व कम्युनिटी जी शिकवण देते त्याचा हे लोक आदर करतात.
 
येथे नित्यनेमाने गेट टूगेदर्स, सांगीतिक कार्यक्रम आणि सुदृढ आयुष्यावर व्याख्याने आयोजित केली जातात. लोमा लिंडा येथील फ्रेजर विद्यापीठातील डॉक्टर गॅरी सांगतात, की 'सेवन्थ डे कम्युनिटी'मधील सदस्य केवळ आयुष्य कसं वाढेल याचा विचार करत नाही, तर उत्तम आरोग्यासह घालवता येण्याजोग्या आयुष्यावर त्यांचा भर असतो.
 
स्त्रियांसाठी चार ते पाच वर्षं आणि पुरुषांसाठी सहा ते सात वर्षांपर्यंत हा कालावधी वाढायला हवा, यावर त्यांचा भर आहे.
 
मेंदूच्या आरोग्यासाठी परस्पर संवाद किती महत्वाचा?
लोकांसोबत मिळून-मिसळून राहिल्याने एकटेपणा वाटत नाही. हे विज्ञानानेही सिद्ध केलं आहे.
 
याबाबत लारा यांनी ज्युडी या तरुणीसोबत संवाद साधला. ती इतर 112 जणांसोबत 'असिस्टेड लिव्हिंग फॅसिलिटी'त एकत्र राहते.
 
ती सांगते 'येथे राहण्यासाठी मन आणि मेंदूची कवाडे खुलतील अशा पद्धतीचे संवाद साधण्याची क्षमता येथील प्रत्येकात तयार झाली आहे.
 
ती सांगते, तिला या गोष्टीची कल्पनाच नव्हती की सामाजिक बांधिलकी आणि एकत्र येणं याचा तुमच्या मेंदूवर किती उत्तम परिणाम होऊ शकतो. नाहीतर मेंदूची वाढ आणि त्याला उत्तम तजेला मिळणं हे शक्यच नाही.' मेंदू परस्पर संवादाने अधिकाधीक समृद्ध होतो. एकटेपणामुळे त्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
 
मेंदूचे अचूक वय आणि मेंदू वेळेआधी वृद्ध होण्याची कारणे
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कुणाचा मेंदू योग्य वेळेच्या आधीच वृद्धत्वाकडे झुकतो हे ओळखणं सुद्धा शक्य आहे. यात संबंधित व्यक्तींचा विशिष्ट पद्धतीने अभ्यास करून किंवा मेंदूचे वय होण्याची प्रक्रिया ट्रॅक करून भविष्यात अशा अडचणींचं निवारण करणं सोपं झालं आहे.
 
यासंबंधी समस्यांचं निदान लवकर करता येणंही शक्य आहे. आपण अधिक अचूक अंदाज बांधणाऱ्या तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कॉम्पुटर मॉडेल्सच्या साहाय्याने मेंदूच्या वृद्धत्वाकडे झुकण्याच्या आणि त्याची कार्यक्षमता कमी होण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करू शकतो, असं अँड्री इरिमिया यांनी सांगितले.
 
ते साऊथ कॅलिफोर्निया येथे गैरेंटोलॉजी आणि कॉम्पुटेशनल बायलॉजीचे सहाय्य्क प्राध्यापक आहेत.
 
त्यांनी जवळपास पंधरा हजार मेंदूंचा MRI च्या साहाय्याने अभ्यास केल्यावर हे निष्कर्ष काढले आहेत.
 
सुदृढ आणि एखादा विकार असलेल्या मेंदूची नेमकी कार्यक्षमता आणि वृद्धत्वाकडे झुकण्याची शैली पद्धत आणि प्रक्रिया कशी आहे, हे समजण्यासाठी AI चा प्रामुख्याने वापर केला गेला.
 
यात डिमेन्शियाचा अभ्यासदेखील केला आहे.
 
हे आधुनिक तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये आपण आपल्या मेंदूविषयी माहित नसलेले पॅटर्न AI अल्गोरिदमच्या साहाय्याने अभ्यासू शकतो असे त्यांनी सांगितले. ह्या भेटीनंतर माझ्याही मेंदूचा MRI केला गेला.
 
आलेल्या निष्कर्षांबद्दल प्रोफेसर इरिमिया यांनी म्हटलं की, माझ्या मेंदूचे वय हे नैसर्गिकरित्या असलेल्या वयापेक्षा आठ महिने अधिक आहे. अर्थात बऱ्याचदा मायनर एररमुळे दोन वर्ष कमीअधिक येऊ शकतात, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
 
अनेक खाजगी कंपन्या आता ह्या तंत्रज्ञानाचा व्यवसाय म्हणून वापर करत आहेत. ब्रेन-की नावाच्या कंपनीने जगभरातल्या अनेकविध क्लिनिकमध्ये ही सुविधा पुरवायला सुरुवात केली आहे.
 
या कंपनीचे संस्थापक ओन फिलिप्स म्हणतात, "MRI करणं आता अधिक सोपं होईल. तसेच ते सहजतेने लोकांसाठी उपलब्धही झालं आहे. आता MRI च्या इमेजेस आधीपेक्षा स्पष्ट आणि व्यवस्थित दिसतात.
 
हे तंत्रज्ञान ज्या पद्धतीने काम करतंय तसं भूतकाळात शक्यच नव्हतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूतल्या हालचाली टिपणं आणि त्यांचा अभयास करणं निश्चितच अधिक रंजक आहे."
 
या सगळ्याला AI ची जोड आहेच. विरोधाभास म्हणजे, प्रोफेसर इरिमिया यांनी माझ्या मेंदूबाबत जे निष्कर्ष काढले त्याच्या अगदी उलट निष्कर्ष ब्रेन-की ने काढला. ज्यात लारा यांच्या मेंदूचे वय हे मूळ वयापेक्षा एक वर्षाने कमी होते. त्याचं 3D मॉडेलही प्रिंट करून दाखवलं गेलं, जे लारा यांना अधिक लक्षणीय वाटलं
 
वाढत्या आयुर्मानाचा मेंदूच्या समस्यांशी संबंध आहे का?
"ज्या पद्धतीने मागच्या 200 वर्षात आयुर्मान वाढलं आहे, त्याने खरंतर वयाशी संबंधित अनेक आजारांना आमंत्रण दिलं आहे. त्यामुळे मला नेहमीच वाटतं की, डिमेन्शिया हा आजार कायम आपला दरवाजा ठोठावत राहील," असे प्रोफेसर इरिमिया म्हणतात.
 
त्यांच्या मते एक अशीही थिअरी आहे (जी अजून पूर्णतः सिद्ध झालेली नाही) ज्यामध्ये डिमेन्शियाची प्रक्रिया लांबवली जाऊ शकते. वाढत्या वयानुसार मेंदूचे वय तुलनेने अधिक वाढल्याने वृद्धांमध्ये अनेक समस्या उद्भवत आहेत.
 
अनेक शास्त्रज्ञ, डॉक्टर आणि ब्लु झोनमधील लोकांचं म्हणणं आहे की, जीवनशैली या सगळ्याचं मूळ आहे. आहार व्यायाम, मानसिक संतुलन आणि आनंदी राहणं हीच केवळ सुदृढ मेंदू आणि सुंदर आयुष्याचे गमक आहे.
 
मेंदूच्या आरोग्यासाठी झोप किती महत्वाची?
महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण का झोपतो ? याबाबत काही महत्वाची निरिक्षणे मॅथ्यू वॉकर यांनी मांडली आहे. ते कॅलिफोर्निया विद्यापीठात न्यूरोसायन्स आणि सायकॉलॉजीचे प्राध्यापक आहेत. ते म्हणतात की, झोप ही अशी गोष्ट आहे जिच्यामुळे आपला मेंदू थकल्यानंतर पुन्हा ताजातवाना होतो.
 
पुरेशी झोप मिळाल्याने आपलं मन अद्भुत अविष्कार अनुभवू शकतं. तसेच झोप न मिळाल्याने याच्या विरूद्ध गोष्टी घडतात. त्यांनी म्हटलं की, आपल्या झोपेची यंत्रणा अल्झायमर आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या दोन प्रोटिन्सवर काम करते. हे प्रोटिन्स म्हणजे बीटा-अमायलोईड आणि टाऊ प्रोटिन्स.
 
झोपण्याच्या पद्धतीत बदल झाला तर अल्झायमर आणि डिमेन्शियाला आमंत्रण ठरू शकतं.
 
प्रोफेसर वॉकर स्पष्ट करतात, की हे सगळं आपल्या साठीत होत असतं ते आता तिशीतही होऊ लागलं आहे. त्यामुळे झोपेत होणाऱ्या बदलांवर नियंत्रण ठेवणं हे मध्यवयीन होणाऱ्या विविध आजारांना प्रतिबंधित करणार मॉडेल ठरू शकतं.
 
खारूताईच्या जीवनशैलीचा अभ्यास करून मानवी मेंदू अधिक सक्रिय करण्याचे प्रयत्न
फॉना बायोटेक ही सॅन फ्रान्सिस्कोपासून जवळच असणारी कंपनी आहे. ही कंपनी विविध खारींचा डेटा गोळा करतात.
 
ज्यात खारुताईच्या हायबेरनेशनच्या आधी आणि नंतरच्या मोडचा अभ्यास करण्यात येतो. हायबरेशनमध्ये खारुताईचे शरीराचे तापमान हे 1% पर्यंत उतरते आणि विविध शारीरिक हालचाली संथ होतात.
 
ह्या काळात खारुताईचे शरीर वेगवेगळ्या कार्यरत नसलेल्या न्यूरॉन्सवर काम करते. जेणेकरून नंतर मेंदू अधिक सक्रिय व्हावा.
 
कंपनीचा उद्देश ह्या प्रक्रियेचा अभ्यास करून तशीच सारखी प्रक्रिया मानवी शरीरात निर्माण करणं व त्यासाठी लागणारे ड्रग्स तयार करणं हा आहे. शिवाय मानवाला खारुताईसारखे हायबेरनेशन मोडमध्ये जाण्याची गरज लागू नये, यासाठी प्रयत्न करणे हाही या संशोधनामागील हेतू आहे.
 
डिप्रेशनवर योग्य उपचार न मिळाल्यास त्याचे डिमेन्शियामध्ये रुपांतर होऊ शकते. याचा अभ्यास करण्यासाठी प्रो. लिन विल्यम, स्टॅनफर्ड विद्यापीठ यांनी एक दृश्य पद्धत शोधून काढली आहे.
 
मेंदूचा अभ्यास करून डिप्रेशनवर काम करता येऊ शकतं.
 
ज्यात MRI स्कॅनचा वापर मोलाचा ठरतो. या सगळ्यामुळे शास्त्रज्ञांना मानसिक आरोग्याचे मूळ शोधून काढण्यास मदत होऊ शकते. आणि त्यावरची उपचारप्रणाली विकसित करण्यासदेखील मदत होऊ शकते.
 
ब्रायन जॉनसन्स या एका तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजकाने कोट्यवधी रुपये स्वतःचं जैविक वय कमी करण्यासाठी घालवले आहे.
 
जॉनसन्सने अनेक सप्लिमेंट्स, भरपूर व्यायाम, एकोणीस तास उपवास असे अनेक प्रकार वय कमी करण्यासाठी निवडले. परंतु याचा पाहिजे तसा फायदा झाला नाही. उलट त्याचे दुष्परिणामच त्याच्या शरीरावर भविष्यात दिसू शकतात, असे अनेक संशोधक म्हणातात.
 
लोमा लिंडामध्ये राहणारी 103 वर्षीय मिल्ड्रेड मात्र वेगळं मत व्यक्त करते.
 
ती म्हणते, 'तुम्ही तुमच्या आहाराविषयी खूप सजग असणं आवश्यक आहे, हे खरं असलं तरीही या सगळ्याकडे इतक्या कठोरतेने पाहणे गरजेचे नाही. मला वाटतं तुम्ही हेच आणि इतकंच खायला हवं किंवा ते अजिबात खायला नको ही बंधनं कट्टरपणे पाळणे हे चूक आहे.
 
आपण जसे आणि जितकी वर्षं जगू भले ते आनंदी असलं पाहिजे. आयुष्यात येणाऱ्या संकटांना आपण धीराने सामोरं गेलं पाहिजे. कदाचित हाच आनंदी आयुष्याचा मंत्र आहे.'
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात मुळ्याच्या पानांची चटणी खाण्याचे फायदे जाणून घ्या

आपल्या जोडीदाराला कसे प्रभावित करावे जेणेकरून नातेसंबंध मजबूत राहतील, जाणून घ्या

विमानात शौचालयातील मलमूत्र कुठे जातं? तुम्हाला माहीत आहे का?

Winter Fruits हिवाळ्यात ही फळे शरीराला हायड्रेट ठेवू शकतात

चिकन कटलेट रेसिपी

पुढील लेख
Show comments