Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उन्हाळ्यात डिनरमध्ये खा या भाज्या, शरीर आरोग्यदायी राहील

Webdunia
बुधवार, 22 मे 2024 (07:00 IST)
जर तुम्हाला उन्हाळ्यात आरोग्यदायी राहायचे असेल तर दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात भरपूर भाजाय सहभागी कराव्या. भाज्या तुम्हाला उन्हाळ्यात अनेक आजरांपासून वाचवतात. 
 
उन्हाळ्याचे दिवस खूप कठीण असतात. उन्हाळ्यात उष्णतेमुळे बद्धकोष्ठता, गॅस, उलटी, एसिडिटी यांसारखे आजर डोके वर काढतात. उष्ण वातावरणामुळे शरीरात पाण्याची पातळी कमी झाल्यास याचा खोल परिणाम शरीरावर होतो . उन्हाळ्यामध्ये रोजच्या जेवणाकडे लक्ष देणे गरजेचे असते. तसेच योग्य प्रमाणात पाणी पिणे देखील गरजेचे असते. चला तर जाणून घेऊ या कोणत्या भाज्या खायला पाहिजे. 
 
काकडी- 
उन्हाळ्यात शरीरात पाणी कमी झाल्यास डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. अशावेळेस तुमच्या डाएटमध्ये काकडी नक्कीच सहभागी करा. काकडी खाल्ल्याने डिहाइड्रेशनची समस्या दूर होते. 
 
शेवगा-
शेवगा शरीरासाठी खूप आरोग्यदायी आणि फायदेशीर आहे. या भाजीच्या झाडाचा प्रत्येक भाग माणसाच्या शरीरासाठी फायदेशीर आहे. शेवगामध्ये अँटीबायोटिक आणि अँटीबॅक्टीरिअल गुण असतात. जे तुम्हाला अनेक प्रकारच्या इंफेक्शनपासून वाचवते. ही भाजी फायबरने परिपूर्ण असते. उन्हाळ्यात थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी तुम्ही शेवग्याच्या पानांचे सेवन करू शकतात. 
 
कारले- 
कारले कडू जरूर असते पण अमृतापेक्षा कमी नाही. कारल्यामध्ये व्हिटॅमिन, आयरन, जिंक, पोटॅशियम, मॅगनीज यांसारखे पोषकतत्वे असतात. डायबिटीज रुग्णांसाठी कारले फायदेशीर असते. एवढेच नाही तर कोलेस्ट्रॉलला देखील कमी करते. 
 
दोडके- 
दोडके हे उन्हाळ्यात मिळणारी व्हिटॅमिनने भरपूर असणारी भाजी आहे. जर तुम्ही पाचन संबंधित समस्यांनी ग्रस्त असाल तर दोडके डाएट मध्ये नक्कीच सहभागी करा. यामध्ये असलेलं एंजाइम पाचनसंस्था सुरळीत करायला मदत करते. 
 
दुधी(भोपळा)-
दुधीचे सेवन शरीरासाठी आरोग्यदायी आहे. पोषकतत्वांनी भरपूर दुधी शरीराला शक्ती प्रदान करते. तसेच डिहाइड्रेशनपासून देखील वाचवते. यामध्ये अनेक प्रकारचे औषधीय गुण आहेत. जे तुम्हाला अनेक गंभीर समस्यांपासून वाचवतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
 
Edited By- Dhanashri Naik  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Sarvapitri Amavasya 2024: सर्वपित्री अमावस्या बद्दल 10 न ऐकलेल्या गोष्टी जाणून घ्या

शारदीय नवरात्रीचे व्रत करण्यापूर्वी नियम जाणून घ्या

गजलक्ष्मी व्रत कथा वाचा, घरात लक्ष्मी नांदेल, सुख-संपत्ती, पुत्र-पोत्रादी आणि कुटुंब सुखी राहील

पितृ दोष म्हणजे काय ? निवारण उपाय जाणून घ्या

Shardiya Navratri 2024 : 3 की 4 ऑक्टोबर, शारदीय नवरात्र कधी सुरू होत आहे, घटस्थापनेची शुभ वेळ जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

डिनरमध्ये बनवा शाही पनीर रेसिपी

पिकलेल्या फणसापासून बनवा ह्या अप्रतिम रेसिपी

स्किनकेअर उत्पादने खरेदी करण्यापूर्वी या 10 गोष्टी लक्षात ठेवा

12वी कॉमर्स नंतर टॉप अकाउंट्स आणि फायनान्स कोर्स करा

पुढील लेख
Show comments