Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Effect of high blood pressure उच्च रक्तदाबाचा मासिक पाळीवर होणारा परिणाम

Webdunia
मंगळवार, 16 मे 2023 (17:50 IST)
उच्च रक्तदाबाचा आणि मासिक पाळीवर परिणाम होत असून वेळीच रक्तदाब नियंत्रित करणे गरजेचे आहे
 
मुंबई - जेव्हा एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब 140/90 mmHg किंवा त्याहून अधिक असतो तेव्हा त्या व्यक्तीला डोकेदुखी, हृदयाची धडधड किंवा नाकातून रक्तस्त्राव यांसारखी लक्षणे दिसून येतात आणि यालाच उच्च रक्तदाब असे म्हटले जाऊ शकते. चुकीच्या आहाराच्या सवयी आणि सोडियमयुक्त पदार्थ सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव आणि तणाव यामुळे उच्च रक्तदाबासारखी समस्या ओढावू शकते. उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तसेच, उच्च रक्तदाब आणि मासिक पाळी यांचाही परस्पर संबंध असून याविषयी या लेखाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले आहे.
 
डॉ. माधुरी मेहेंदळे, स्त्रीरोग तज्ञ, झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल सांगतात की, प्री मेस्ट्रुअल सिंड्रोम (पीएमएस), वेदनादायक पाळी (डिस्मेनोरिया), अति रकितस्त्राव (मेनोरेजिया) आणि अनियमित मासिक पाळी असलेल्या स्त्रियांना अनेकदा उच्च रक्तदाब असतो ज्यामुळे त्यांना हृदयविकार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही.  उच्च रक्तदाब देखील अनियमित मासिक पाळीशी संबंधित आहे. मासिक पाळीच्या दरम्यान होणारा अधिक रक्तस्त्राव आणि भावनिक त्रास देखील उच्च रक्तदाबाशी संबंधित आहे. थकवा, पुरळ, गोळा येणे, मूड बदलणे, चिंता, एकाग्रतेचा अभाव आणि भूकेसंबंधी समस्या ही पीएमएसिंगची विशेष लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे मासिक पाळीच्या वेळी उच्च रक्तदाबासही कारणीभूत ठरू शकतात. तीव्र मासिक पाळी असलेल्या महिलेला उच्च रक्तदाबाचा धोका असण्याची शक्यता असते. मासिक पाळी दरम्यान महिलांनी तणावाचे व्यवस्थापन करावे, डॉक्टरांनी सांगितल्यानुसार रक्तदाबाचे निरीक्षण करावे, पुरेशी झोप घ्यावी आणि भरपुर द्रव पदार्थांचे सेवन करावे जेणेकरुन शरीर हायड्रेटेड ठेवता येईल.
 
अपोलो स्पेक्ट्रा मुंबईचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नितीन गुप्ते सांगतात की, मासिक पाळीच्या सुरुवातीला उच्च रक्तदाब ही पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांमुळे दिसून येतो. संबंधित समस्यांसह रक्तदाबासाठी काही औषधे जसे की रक्त पातळ करणे किंवा काही वेदनाशामक औषधांमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतो. ज्या महिलांना मासिक पाळी येत आहे त्यांनी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा. ताजी फळे आणि भाज्या, कडधान्ये, शेंगा आणि मसूर यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्यावा. आहारातील मीठाचे प्रमाण मर्यादित राखावे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करावा तसेच डॉक्टरांनी सांगितलेली औषधांचे वेळोवेळी सेवन करावे, रात्रीच्या वेळी पुरेश झोप घ्यावी, योगासने किंवा ध्यानधारणा करून तणाव कमी करावा, दररोज न चुकता रक्तदाब तपासा आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये तणावमुक्त रहा. कॅफीन, अल्कोहोल आणि साखरेचे सेवन कमी करा आणि मासिक पाळीत निरोगी रहा.अतिस्रावाची मासिक पाळी (मेनोरेजिया) आणि उच्च रक्तदाबामुळे महिलांना विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

Christmas 2024: विशेष रेसिपी ट्री ब्राउनी

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

केस निरोगी ठेवण्यासाठी ताकासोबत चिया सीड्स चे सेवन करा हे फायदे मिळतील

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्तीसाठी तुपात मिसळून हे खा, आजार दूर राहतील

पुढील लेख
Show comments