Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरोग्यासाठी हाय एनर्जी सीड्‍स किती फायदेशीर आहे, जाणून घ्या

Webdunia
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018 (10:59 IST)
जवसाच्या बिया : 
या बियांमध्ये प्रथिने, ब 1 जीवनसत्त्व, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्‌स, झिंक, मॅग्नेशियम, कॉपर हे क्षार असतात. दोन टेबलस्पून जवसाच्या बियांमध्ये 6 ग्रॅम फायबर आणि 4 ग्रॅम प्रथिने असतात.
 
शेंगदाणे :
शेंगदाण्यांमध्ये प्रथिने आणि शरीराला आवश्‍यक असणारी फॅट्‌स भरपूर प्रमाणात असतात. कच्चे, भाजलेले खारे शेंगदाणे किंवा गूळ-शेंगदाण्याचा लाडू, शेंगदाण्याचा कूट, चिक्की अशा कोणत्याही प्रकारात शेंगदाणे खाता येतात. मात्र, पचायला जड असल्याने शेंगदाणे प्रमाणातच खावेत.
 
हळीव :
100 ग्रॅम हळिवांत तब्बल 100 मिलिग्रॅम आयर्न असते. तसेच लोह, कॅल्शियम, फॉलेट, बेटाकेरोटीन, क जीवनसत्त्व व टोकोफेरॉक हे पोषक घटक असतात. रज:स्रव नियमित करण्यात मदत करते. यात अँटिऑक्‍सिडंट्‌स व रक्तशुद्धी करणारे घटक असतात. अंकुरलेले हळीव सलाडमध्ये घालून घेतल्यास ते डोळ्यांसाठी हितकर आहेत. हळिवांतील चिकट गुणधर्मामुळे मलाविरोधाची तक्रार कमी होते. हळिवाच्या गॉयट्रोजेनिक गुणधर्मामुळे हायपोथायरॉईडचा त्रास असणाऱ्यांनी या बियांचे पदार्थ खाऊ नयेत.
 
काळे आणि पांढरे तीळ :
तीळ बुद्धी वाढवितात, दातांसाठी हितकर असतात, वर्ण उजळवतात, व्रण भरून येण्यासाठी हितकर असतात, वाताला कमी करतात व कफ वाढवितात. तसेच, मूळव्याधीवर गुणकारी, हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहेत. वजन वाढविणाऱ्या आणि कमी करू इच्छिणाऱ्या अशा दोघांनीही तीळ खाणे हितकारक आहे. काळ्या तिळांत औषधी गुणधर्म असतात.
 
भोपळ्याच्या बिया : 
यामध्ये ई जीवनसत्त्व, झिंक, मॅंगेनीज, फॉस्फरस, मोनोसॅच्युरेटेड फॅट्‌स, ओमेगा 6 फॅटी ऍसिड्‌स असतात, हृदयविकार, मधुमेहींसाठीही भोपळ्याच्या बिया उपयुक्त आहेत. सर्व प्रकारचे कॅन्सर्स, विशेषत: प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. यासाठी रोज दोन ते चार चमचे भोपळ्याच्या भाजलेल्या बिया खाल्ल्याच पाहिजेत.
 
सूर्यफूलाच्या बिया : 
सूर्यफुलात ई जीवनसत्त्व, कॅल्शियम, अँटी ऑक्‍सिडेंट्‌स मोठ्या प्रमाणात असतात. या बिया पोषणमूल्यांनी अत्यंत समृद्ध आहेत. या बियांमधील फायटोसस्टेरॉल घटकामुळे कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते. रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. केसांची मुळे घट्ट होतात. मासिक पाळीच्या वेळी होणारी चिडचिड, मूड स्विंग, पोटदुखी आदी त्रास कमी होतात.
 
खसखस : 
या काहीशी मातकट चव लागणाऱ्या बिया पोषणमूल्यांनी समृद्ध असतात. यातून कॅल्शियम, लोह, प्रथिनेही मिळतात. यात प्रति औंस 6 ग्रॅम फायबर्स असतात. यामुळे पचनक्रिया सुधारते. यामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. पोटदुखी, उलटीच्या समस्येवर गुणकारी आहेत.

संबंधित माहिती

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

तेनालीराम कहाणी : लाल मोर

आरोग्यासाठी फायदेशीर आहे नारळाची मलाई

पुढील लेख
Show comments