Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आतड्यामधील सूज कर्करोगाचा धोका वाढवू शकते जाणून घ्या ह्याची लक्षणे आणि उपचार

Webdunia
शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (19:39 IST)
बऱ्याचदा आतड्यामधील सूज  होणं काही लहान समस्या नसून गंभीर समस्या बनते. ह्याची लक्षणे सामान्य असतात परंतु बऱ्याच वेळा लोकांना या बद्दल माहितीच नसते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की ह्याची लक्षणे अचानक दिसून येण्याऐवजी हळू-हळू वाढतात. आतड्यातील ही सूज मेडिकल च्या भाषेत अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणवली जाते. बऱ्याच काळ ही सूज असल्यामुळे आतड्याचा कर्करोग होण्याचा  धोका वाढतो. घरगुती उपाय करून या समस्येपासून सुटका मिळवणे कठीण आहे परंतु या मुळे थोड्या प्रमाणात आराम मिळू शकतं आणि हा आजार वाढण्यापासून रोखले जाऊ शकत.चला ह्याचा लक्षणाबद्दल जाणून घेऊ या आणि असे कोणते उपाय आहे जे या आजारात आराम मिळवून देतात.
 
लक्षणे- 
पोटात दुखणे आणि मुरडा येणं, अतिसार, गुदद्वारात वेदना आणि रक्त पडणे, पचनाशी निगडित त्रास,वारंवार मळ त्यागण्याची इच्छा होणं, मळ त्यागण्यास त्रास होणं, भूक न लागणं, वजन कमी होणं,थकवा आणि ताप येणं,हृदयाचे ठोके वाढणे.     
 
* आतड्याच्या सुजेला कमी करण्यासाठी सर्वात आवश्यक आहे पाणी -
आतड्यातील सूज कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी घरगुती उपाय आहे भरपूर प्रमाणात पाणी पिणं. हे निर्जलीकरण प्रतिबंधित करते. आतड्यांची सूज असलेल्या रुग्णांची सर्वात मोठी समस्या असते डिहायड्रेशन. वास्तविक अतिसार झाल्यामुळे त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता होते. या साठी महत्त्वाचे आहे की पाण्याची कमतरता पूर्ण करावी. अशा परिस्थितीत रुग्णांना दिवसभर थोड्या  थोड्या प्रमाणात पाणी पिण्यासाठी द्यावे.
 
 
* कोरफड -
आतड्याच्या सुजेला कोरफड कमी करत. कोरफडात अँटी इंफ्लिमेंट्री गुणधर्म आढळतात. कोरफडाचे बरेच फायदे आहे ,जसं की ह्याचा वापर जखम भरण्यासाठी  आणि वेदना कमी करण्यासाठी  करतात. तसेच आतड्याची सूज कमी करण्यासाठी देखील सहाय्यक आहे. असं दिसून आले आहे की काही रुग्णांमध्ये कोरफडचा रस प्यायल्यावर आतड्याच्या सुजांमध्ये सुधारणा झाली आहे. हे घेण्यापूर्वी आपण डॉक्टर चा सल्ला घ्यावा. 
 
* प्रथिने  भरपूर घ्यावे-  
आतड्याची सूज येणाऱ्या रुग्णांना प्रथिने असलेले पदार्थांचे सेवन करावे. अशा रुग्णांना मासे,अंडी,कोंबडी,आणि शेंगदाण्याच्या तेलाचे सेवन करणे फायदेशीर आहे.तळकट, मसालेदार, चमचमीत आणि जास्त भाजके पदार्थ घेणे टाळावे.कारण हे पदार्थ आपले त्रास अधिक वाढवू शकतात. या साठी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 
* व्हिटॅमिन डी फायदेशीर आहे- 
या रुग्णांना व्हिटॅमिन डी खूप फायदेशीर आहे. या साठी दुधाचे सेवन करावे. या मध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते.
 
* नारळाच्या तेलाचे सेवन- 
नारळाच्या तेलाचे सेवन आपल्या आहारात करावे. या मुळे आतड्यांच्या समस्येपासून आराम मिळतो. वैज्ञानिक दृष्टया देखील हे सिद्ध झाले आहे.
 
* ग्रीन टी घ्या- 
ग्रीन टी हे औषधी गुणधर्माचे आहे. लोक ह्याला सुपरफूड देखील म्हणतात. हे केवळ वजन कमी करण्यातच नाही तर आतड्यांची सूज येणाऱ्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे.
 
हे घेणं टाळा- 
 
बटाटा,वांग,टोमॅटो सारख्या भाज्या, तीळ,बोर,स्ट्राबेरी सारखी फळे,अक्रोड.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

गरोदरपणात पोहे खाल्ल्याने मिळतील हे 5 आरोग्य फायदे, जाणून घ्या

आत्मविश्वास वाढवण्यासाठी रोज करा ही योगासने, जाणून घ्या फायदे

अकबर-बिरबलची कहाणी : विहिरीचे पाणी

Tuesday Born Baby Girl Names मंगळवारी जन्मलेल्या मुलींसाठी शुभ नावे

Tuesday Born Baby Boy Names मंगळवारी जन्मलेल्या मुलांसाठी शुभ नावे

पुढील लेख
Show comments