Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वांझपणा पासून मुक्तता : वांझपण जीवनशैली संबंधित समस्या

Webdunia
बुधवार, 8 डिसेंबर 2021 (14:25 IST)
वांझपण म्हणजे व्यक्तीच्या गर्भधारणेत योगदान देण्यास शारीरिक अक्षमता. जर महिलेचे वय ३४ वर्षापेक्षा कमी आणि दाम्पत्यांना १२ महिन्यांपर्यंत गर्भनिरोधक मुक्त यौन संबंध ठेवल्या नंतरही गर्भ राहत नाही , किंवा महिलेचे वय ३५ वर्षाहून अधिक (३५ वर्षाहून अधिक मध्ये अंडाच्या गुणवत्तेत कमीपणा वयाच्या मानाने विकार आहे) आणि दाम्पत्यांना ६ महिने गर्भनिरोधाशिवाय यौन संबंध ठेवून देखील गर्भ राहत नाही तर तपासणीची गरज असे. हे वांझपण एका महिलेच्या त्या अवस्थेला देखील म्हणता येईल जी पूर्ण काळापर्यंत गर्भ ठेवू शकत नाही.
सामान्यतः जागतिक अनुमान आहे की, प्रत्येक सातपैकी एका दाम्पत्यास गर्भधारणेस समस्या असते. देशाच्या विकासाचा स्तर काहीही असो, ही अवस्था सर्वठिकाणी जवळ जवळ सारखीच असते. वांझपणाची वैश्विक औसत १३-१८ टक्के आहे. भारतात वांझपणाची औसत १० ते २०टक्क्या दरम्यान आहे.
 
भारतात सध्या लोकसंख्येची वाढ एक प्रमुख चिंता आहे, परंतु वांझ दाम्पत्यांची संख्यासुद्धा जास्त आहे, अश्याप्रकारे रिप्रॉडक्टिव्ह स्वस्थाशी संबंधित एक महत्वपूर्ण राष्ट्रीय समस्या मानली जाते.
वांझपण सामान्यतः पुरुष आणि स्त्री ह्या दोन्ही जोडीदाराच्या योगदानामुळे होतो. वांझपणाचे कित्येक बायोलॉजिकल कारण आहे. त्याच्यातून काहींचे निवारण चिकित्सकीय हस्तक्षेपाद्वारे होऊ शकतात. वांझपणाचे अधिकतम प्रकरणे अनुवांशिक कारणांवरून होतात आणि त्यांना थांबू शकत नाही. परंतु हे शक्य आहे की, वांझपणाच्या काही संभाव्य प्रकारांना आपण आपल्या रोजच्या जीवनशैलीत काही बदल आणून थांबवू शकतो. ज्या वातावरणात आपण राहतो, त्याचे आणि आपल्या जीवनशैलीचा आपल्या संभावित प्रजनन क्षमतेवर मोठा प्रभाव पडतो. मागील काही काळापासून वांझपण एक चिकित्सकीय समस्यांपेक्षा जास्त जीवनशैलीची समस्या झाली आहे. ह्याची माहिती घेऊन की कोणाच्या प्रजनन क्षमतेत काय काय समाविष्ट आहे आणि संभाव्य धोक्यांना टाळण्यासाठी मार्ग काढणे हा उचित मार्ग आहे, जो कोणालाही वांझपण थांबवण्यास मदत करू शकतो.
१) सर्वप्रथम काही सवयी जसे धूम्रपान आणि नशायुक्त पदार्थांच्या सेवनाचा कोणत्याही प्रजनन क्षमतेवर घटक प्रभाव पडू शकतो. धुम्रपानास पुरुषांमध्ये कमी स्पर्म काउंट आणि स्लगीश स्पर्म मुव्हमेंट्सही जोडले गेले आहे , तसेच महिलांमध्ये वाढते गर्भपातदेखील आहे.
अल्कोहोलचे अत्याधिक सेवन पुरुष आणि महिला दोघांच्या प्रजनन क्षमतेला प्रभावित करतो. अल्कोहोल शुक्राणूंसाठी टॉक्सिक आहे, अल्कोहोल स्पर्म काउंट कमी करतो, यौन क्षमतेस प्रभावित करतो, हार्मोन्स संतुलन बिघडवतो आणि गर्भातेचा धोका वाढवतो.
२) संतुलित आहार ज्यात कर्बोदके,प्रोटीन आणि फायबर युक्त पदार्थ खायला पाहिजे. मांसमटन ऐवजी मुबलक फायबर आणि आयर्नचा पुरवठा करणाऱ्या प्रोटीनयुक्त भाज्यांचा आहारात समावेश आसावा. कार्बोहायड्रेट्सपेक्षा कमी ट्रान्सफेन्ट आणि शुगर असलेले पदार्थ, अधिक हायफेन्ट डेअरी प्रॉडक्ट्स आणि कमी चरबीयुक्त डेअरी प्रोडक्ट्स सोबत मल्टीव्हिटॅमिन घेतल्याने महिलांमध्ये ओव्यूलेटरी विकारांच्यामुळे होणाऱ्या वांझपणाचा धोका कमी होतो. असंतुलित भोजनामुळे व्हिटॅमिन सी, फौलेट, सेलेनियम किंवा झिंकच्या कमतरतेमुळे वांझपणाचा
धोका वाढतो. सर्व महिलांमध्ये गर्भधारण करण्याअगोदर आणि गर्भधारणा करण्याच्या तीन महिन्यात स्पाईना बीफडा नामक न्यूरल ट्यूब विकारांचा धोका कमी करण्यासाठी फॉलिक एसिड इंटेक ( जे हिरव्या पालेभाज्या, फळे, डाळीमध्ये असतात आणि सप्लिमेंटच्या रुपातसुद्धाउपलब्ध असतात.) वाढवले पाहिजे.
३) शारीरिक हालचाल आणि व्यायामाची मध्यम मात्रा व्यक्तीच्या प्रजनन क्षमता वाढवू शकतात. पण अधिक प्रमाणात व्यायाम महिलांमध्ये मासिक स्त्रावात समस्या निर्माण करू शकतो आणि पुरुषांमध्ये अंडकोशाच्या आजूबाजूला गर्मी वाढल्याने शुक्राणूंच्या उत्पादनाला प्रभावित करू शकतो.
४) वजन जास्त प्रमाणात वाढू न देणे, वांझपणातून वाचण्याचा एक श्रेष्ठ उपाय आहे. जाडेपणामुळे पुरुषांमध्ये गर्मी वाढून शुक्राणूंची मात्रा कमी होते आणि महिलांमध्ये ओव्यूलेशनवर दबाव पडतो जे वांझपणाचे कारण आहे.
इथे मुख्य संदेश हा आहे की, ओव्यूलेशनची समस्या असल्यास आपल्या रोजच्या जीवनात योग्य आहार आणि शारीरिक हालचालींचा समावेश केल्यास प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होऊ शकते.
५) प्रजनन क्षमतेला प्रभावित करण्याऱ्या करणाऱ्या काही चिकित्सकीय अवस्थेसाठी वार्षिक तपासणी केली पाहिजे. पेल्विक इंफ्लेमेटरी डिजीज (पीआयडी), एन्डोमेट्रियोसिस आणि सर्वाइकल कँसर सारख्या अवस्थेची वेळेवर माहिती मिळाली तर वांझपणा थांबवू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त यौन संक्रमित रोगांचे निदान आणि त्याप्रकारच्या योग्य उपचाराने प्रजनन क्षमतेला वाचवण्यास मदत मिळते.
६) डॉक्टारांद्वारे प्रिस्क्राईब केलेले औषधे आणि हर्बल उपचारांचा प्रजनन क्षमतेला फायदा होतो. अश्या औषधांविषयी प्रसूती विशेषज्ञांशी बोलणी केली पाहिजे. ह्या व्यतिरिक्त मारिजुआना आणि कोकेन सारख्या नशायुक्त औषधांचा त्याग केला पाहिजे, कारण यांचा पुरुषांमध्ये शुक्राणूंची मात्रा कमी होण्याशी आणि महिलांमध्ये वांझपणाशी संबंध आहे.
७) कीटकनाशक, लीड, भारी धातू,टॉक्सिक रसायन आणि आयोनैजिंग रेडिएशन सारख्या पर्यावरणीय विष आणि धोक्यांपासूनही वाचले पाहिजे.
८) शहरातील जलद स्पर्धात्मक युगात जीवनशैली आपले रंग दाखवीत आहे. वर्किंग कपल्समध्ये वांझपणा वाढत आहे. जास्त ताण आणि कमी झोपेमुळे वांझपणाचा धोका बळावतो आहे.ध्यान, योगा आणि दीर्घ श्वासोच्छवास घ्या, प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन सारखी अन्य तणावमुक्त पद्धतींचा वापर केल्याने तणाव कमी करण्यास मदत मिळू शकते.
Dr Hrishikesh Pai 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Breakfast special : ओनियन पराठा रेसिपी

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

Career in MBA in Healthcare Management : हेल्थ केअर मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

हेअर सीरम कसे वापरावे? जाणून घ्या 5 फायदे

Health Tips: प्रथिनांच्या कमतरतेवर मात कशी करावी

पुढील लेख