Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमस्था अवलेह काय आहे ? वाचा आयुर्वेदिक औषधाचा चमत्कारी प्रभाव

Webdunia
रविवार, 12 फेब्रुवारी 2023 (11:17 IST)
अमस्था अवलेह (Amastha Awaleha) एक आयुर्वेदिक औषध आहे ज्याचा वापर कफ, खोकला, सरदी, आणि छातीत जडपणा असल्यास घेण्याचा सल्ला दिला जातो. आजकाल जेव्हा प्रतिजैविकांचे दुष्परिणाम लोकांना त्रास देत आहेत, तेव्हा या औषधाला अधिकाधिक पसंती दिली जात आहे. हे मुळात च्यवनप्राशासारखाच असतं पण चव च्यवनप्राशापेक्षा कितीतरी पटीने चांगली असते.
 
अमस्था अवलेह चे फायदे | Amastha Awaleha Benefits
 
अमस्था अवलेह चे सेवन केल्याने अनेक समस्यांपासून आराम होतो
 
-याचे सेवन केल्याने श्वासोच्छवासाच्या समस्येपासून तुम्ही मुक्त होऊ शकता.
 
-छातीत जडपणाची समस्या दूर होऊ शकते.
 
-ऍलर्जी होण्याची शक्यता कमी होते.
 
-इम्यूनिटी साठी हे फायदेशीर आहे.
 
-फुफ्फुसाच्या संसर्गापासून संरक्षण होतं.
 
-छाती आणि पोट याची क्रिया सुधारते.
 
- किडनी स्टोनवर गुणकारी.
 
- अतिसार, आमांश आणि अपचन यांवर फायदेशीर.
 
- जुन्या जखमा, अल्सर आणि फोडांवर फायदेशीर.
 
- सरदीमध्ये खूप फायदेशीर.
 
- यात कर्करोग विरोधी गुण देखील आढळतात.
 
अमस्था अवलेह कसा तयार केलं जातं | (Amastha Awaleha is prepared by mixing these herbs)
अमस्था अवलेह अनेक शुद्ध आणि प्रभावी औषधी वनस्पती एकत्र करुन तयार केलं जातं. वासा, कंटकारी, यष्टिमधु, दशमूल, भृंग, पुष्करमूल, कचूर, बहेड़ा, हल्दी, चित्रक, 
 
गाजबान, गिलोय, लिसोड़ा, तुळस, मुस्तक, बबूलछाल, काकड़ासिंगी, सोंठ, मरीच, पीपली, रुदन्ति, दालचीनी, लवंग, वेलची, तेजपान, केशर, आवळा पिष्टी, पूह, स्टक, 
 
आणि शीशमचे तेल मिसळून अमस्था अवलेह तयार केलं जातं. अमस्था अवलेह अशी बूटी मिळवून तयार केलं जातं ज्याने अस्थमा आणि श्वसन समस्या
 
पासून संरक्षण करण्यास मदत होते.
 
कसे वापरावे अमस्था अवलेह | How to use Amastha Awaleha
 
रुग्णांना अमस्था अवलेह कोमट पाण्यात किंवा दुधात मिसळून सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
 
एक चमचा अमस्था अवलेह कोमट पाण्यात मिसळून पिण्याने फायदा दिसून येतो.
 
अमस्था अवलेह चे साइड इफेक्ट अजून बघण्यात आलेले नाही. मात्र जठरासंबंधी किरकोळ समस्या उद्भवू शकतात.
 
याचे सेवन रात्री करणे योग्य मानले जाते.
 
जेवल्यानंतर मधासोबत घेणे फायद्याचे म्हटले गेले आहे.
 
कोमट पाण्यासोबत समान प्रमाणात घेता येते.
 
दिवसातून दोनदा घेतल्यास त्याचा प्रभाव वाढतो.
 
खबरदारी: कोणतेही औषध घेण्यापूर्वी आपल्या प्रकृतीप्रमाणे आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मासिक पाळी असलेल्या, गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी ते घेण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा. हे गरम औषध आहे ज्यामुळे हानी होऊ शकते.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments