Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Boost Immunity प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे उपाय अवलंबवा

Webdunia
गुरूवार, 12 जानेवारी 2023 (08:20 IST)
एकदा पुन्हा कोरोनाचा धोका असल्यामुळे कोरोनाच्या वाढत्या धोक्यात आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची हे माहीत असणे गरजेचे आहे. जगभरात कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. डॉक्टर आणि वैज्ञानिकांप्रमाणे रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्याने कोरोनाचा धोका वाढतो. आपली रोग प्रतिकारक शक्ती आपले बऱ्याच रोगांपासून आपले रक्षण करते. आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्यास रोगाचा आपल्या शरीरांवर नियंत्रण होतो. 
 
जे लोक अनेकदा आजारी पडतात त्याचा अर्थ आहे त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत आहे . रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या मुलांना हवामानच्या बदलण्याने लगेच सर्दी, पडसे, ताप या सारख्या समस्यांना सामोरा जावे लागते. 
 
रोग प्रतिकारक शक्ती अनेक प्रकारांच्या जिवाणू संक्रमण, फंगस संक्रमणापासून संरक्षण करते. रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्यास आजारी पडण्याची शक्यता वाढते. तसेच मुलांमध्ये संसर्ग पसरण्याचा धोका जास्त असतो. मुलांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे 4 मुख्य टिप्स आहे जाणून घ्या काय केल्याने मुलांची प्रतिकारक शक्ती वाढेल.
 
* रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी चांगली झोप घेणे आवश्यक आहे. रात्री उशिरा पर्यंत जागल्याने आपली प्रतिकारशक्ती कमी होत जाते. मुलांना कमीत कमी 9 तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
* बहुतांश आजार अन्नामुळे होतात. खान-पान व्यवस्थित नसल्यास शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते. त्यामुळे साथीच्या रोगांचा धोका वाढवू लागतो. बाहेरचे खाद्य पदार्थ, जॅक फूड, पॅकबंद ठेवलेले पदार्थ, गोड पदार्थांचा जास्त सेवन केल्याने मुलांची रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते.
 
* डॉक्टर नेहमीच सांगतात की काहीही खाण्याचा पूर्वी आपण आपले हात स्वच्छ धुवावेत. मुलांनी काहीही खाण्याचा पूर्वी आपले हात धुऊनच खावे. सर्व जंतू आणि विषाणू हाताच्या माध्यमाने आपल्या शरीरात पोहोचतात. असे होऊ नये हे टाळण्यासाठी आपल्या मुलांना काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्याची चांगली सवय लावा.
 
* ताण तणाव हे माणसाला आतून पोकळ करते. काही पालक अभ्यासासाठी किंवा इतर गोष्टींसाठी मुलांना हुणावतात अशाने त्यांचा मनावर ताण येते आणि ते ताण तणावाचे बळी पडू शकतात. मुलांना कोणत्याही प्रकाराच्या ताणापासून मुक्त ठेवल्यास त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढेल.
 
आपण आपल्या सकस आणि चांगल्या आहाराने या संरक्षण प्रणालीस बळकट ठेवू शकतो  संतुलित आहार, नियमित व्यायाम, उच्च प्रथिनेयुक्त आहार, व्हिटॅमिन सी, मल्टी व्हिटॅमिन, मल्टी मिनरल, अमीनो ऍसिड, ओमेगा 3, फॅटी ऍसिड, तसेच प्राणायाम, श्वासोच्छ्वास नियंत्रण, अनुलोम विलोम, भ्रस्तिका, कपाळ भाती या सारखे व्यायाम करून आपण चांगली रोग प्रतिकारक शक्ती मिळवू शकतो.
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

डिनर स्पेशल मटर पुलाव

Health Benefits of Broccoli : ब्रोकोली हिवाळ्यातील सुपर फूड आहे फायदे जाणून घेऊया

Career in MBA in Agribusiness : कृषी व्यवसायात एमबीए कोर्स मध्ये करिअर

केसांना कापूर तेल लावल्याने कोणते फायदे होतात?

पुढील लेख