suvichar

वाढते वजन कमी करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Webdunia
शुक्रवार, 19 डिसेंबर 2025 (07:00 IST)
Weight Loss Tips :वाढते वजन किंवा लठ्ठपणा ही सध्याच्या काळातील एक गंभीर समस्या आहे. आकडेवारीनुसार, जगातील सुमारे 13 टक्के लोकसंख्या या समस्येचा बळी आहे. लठ्ठपणा हे गंभीर आरोग्य समस्यांचे कारण असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. त्यामुळे मधुमेह, हृदयविकार यासारख्या गंभीर आजारांचा धोका खूप वाढतो. हेच कारण आहे की आरोग्य तज्ञ सर्व वयोगटातील लोकांना वजन नियंत्रणाची शिफारस करतात.
ALSO READ: शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात
प्रत्येक व्यक्ती ताजेतवाने दिसण्यासाठी काही न काही करतं असतो. जेणे करून आपण फिट आणि तंदुरुस्त दिसायला हवं. आपण त्यासाठी बरंच काही करत असतो कधी डायटिंग करतो तर कधी जिम मध्ये जाऊन तासन्तास वर्कआउट करत असतो पण एवढं करून ही बघावा तसा फायदा होत नाही. आणि आपल्याला नैराश्य येते. आणि वजन परत वाढलेलेच. म्हणून आम्ही आज आपल्याला काही उपाय सांगत आहोत जेणे करून आपले वजन कमी होईल आणि आपण फिट आणि स्फूर्तीवान दिसाल. 
 
वजन वाढण्यास कारणीभूत घटक-
आरोग्य तज्ञ म्हणतात, लठ्ठपणा सामान्यतः जास्त खाणे आणि खूप कमी हालचाल किंवा शारीरिक हालचालींच्या अभावामुळे होतो. जर तुम्ही जास्त प्रमाणात कॅलरी, चरबी आणि मिठाई वापरत असाल, परंतु व्यायाम आणि शारीरिक हालचाली कमी असतील, तर बहुतेक अतिरिक्त ऊर्जा शरीरातील चरबी म्हणून साठवली जाते. यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो.या साठी या काही टिप्स अवलंबवा.
ALSO READ: हिवाळ्यात भिजवलेले मनुके खा; त्याचे फायदे जाणून घ्या
* ताणतणाव दूर ठेवा- कधी कधी आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वागून देखील काही उपयोग होत नाही आणि वजन वाढतच राहते. त्यासाठीचे ताण तणाव घेऊ नका.
 
* तळलेले पदार्थ कमी घ्या   - आपल्या जेवण्यात तेलकट आणि तुपकट कमी खावे. तळलेल्या पदार्थामध्ये कॅलोरी जास्त प्रमाणात असते ज्या मुळे शरीरात फॅट्स वाढते आणि त्यामुळे शरीर स्थूल होतं आणि वजन वाढते.
ALSO READ: चहा कोणी पिऊ नये? चहा कधी आरोग्यदायी असतो?
* तांदळाचा वापर कमी करा -  आपल्या सर्वांचा घरात दररोज भात बनवला जातो. असे म्हटले जाते की जेवणात भात नसेल तर ते जेवण संपूर्ण नसते. पण भाताच्या सेवनाने वजन वाढते कारण भातात कॅलरी जास्त असतात. त्यामुळे वात आणि वजन दोन्ही वाढते. आपण पांढऱ्या तांदळाच्या ऐवजी ब्राऊन तांदळाचा वापर करावा. ह्यात कॅलरीच प्रमाण कमी असतं. हे खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते. ह्यामध्ये ग्लॅसिमिक इंडेक्स कमी प्रमाणात आढळतं.
 
* आहाराच्या प्रमाणाकडे लक्ष द्या - काहीवेळा आपण वजन कमी करण्यासाठी काही पदार्थांचा आपल्या आहारात समावेश नाही करतं आणि एखाद्या वेळा ते पदार्थ खाण्याचा मोह आवरला जात नाही आणि आपण ती खातो. पण असे केल्याने आपल्या केल्याचे सार्थक होणार नाही त्यामुळे असं करण्याचा मोह टाळा.
 
* न्याहारी वेळेत घ्या - काही जण स्वतःला फिट दिसण्यासाठी कमी खातात. सकाळची न्याहारी सुद्धा घेत नाही का तर वजन वाढू द्यायचे नाही म्हणून. असं केल्यानं गॅस आणि पोटफुगी सारख्या समस्यांना सामोरी जावे लागते. सकाळची न्याहारी पौष्टिक घेणे सर्वात उत्तम, त्यामुळे आपणास सारखी सारखी भूक लागणार नाही. आपण ओट सारखे पौष्टिक पदार्थ घेऊ शकता.
 
* आहार वेळेवर घ्या - एकाच बसणीचे जेवण करण्यापेक्षा दिवसातून 4 ते 5 वेळा थोडं थोडं करून आहार घ्यावा. आहारात तळलेले पदार्थ घेण्यापेक्षा वाफवलेले किंवा भाजक्या  पदार्थांचा समावेश करावा.
 
टीप : आपापल्या शारीरिक क्षमतेनुसार कार्य करावे आणि काहीही करण्याच्या आधी योग्य तज्ज्ञांच्या सल्ला घ्या.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

गोड-आंबट वरण, महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी

Who should avoid Lychee या ५ प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नये 'लिची'; फायद्याऐवजी होईल मोठे नुकसान!

घराच्या कोपऱ्यात लपलेली झुरळे आणि मुंग्या होतील गायब; फक्त हा १ सोपा घरगुती उपाय करून पहा!

चविष्ट, पौष्टिक आणि झटपट होणारा दक्षिण भारतीय पदार्थ व्हेज उपमा

व्हाईट ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेड का खावा? जाणून घ्या मोठे फायदे

पुढील लेख
Show comments