Marathi Biodata Maker

नागीण आजार, माहिती आणि औषधोपचार

Webdunia
सोमवार, 27 जानेवारी 2020 (15:28 IST)
"नागीण" हे नाव एकल्यावरच अंगाचा थरकाप उठतो. या आजाराविषयी समज कमी तर गैर समज जास्त आहे. नागिणीने विळखा मारला की जीवाला धोका असतो. खरं तर योग्य काळजी घेतल्यास नागिणीचा प्रसार कमी करता येतो. त्यासाठी योग्य वेळेस औषधोपचार करायला हवे. नागिणीचा आजार कशा मुळे होतो, त्याची लक्षणे, आणि त्यासाठीचे काय औषधोपचार आहे आणि काय काळजी घ्यावयाची असते हे जाणून घेऊ.....
 
नागीण होण्यामागील कारण
उन्हाळा सुरू झाल्यास वाढत्या तापमानामुळे साथीचे आजार पसरतात. या ऋतूत विषाणू जास्त पसरतात आणि सक्रिय असतात. लहान मुलांमध्ये कांजण्या होतात. लहानपणी होणाऱ्या कांजण्यांमुळे त्या आजाराचे विषाणू रुग्णात मज्जारज्जू मध्ये वास्तव्य करतात. शरीरातील रोग प्रतिरोधक शक्ती कमी झाल्याने हे सुप्त विषाणू जागृत होऊन नागिणीचा आजार पसरवतात. 
मधुमेह, प्रतिरोधक शक्ती कमी करणारे औषधे, एड्स, केमोथेरपी मध्ये वापरल्या जाणार्‍या औषधांमुळे शरीराची रोग प्रतिरोधक शक्ती कमी होते आणि नागिणीचा आजार उद्भवतो.
 
लक्षणे: 
1 नागीण होण्याआधी काही वेळेला त्या भागात दुखायला लागते.
2  त्वचा हुळहुळी होऊन त्वचेची आग होते.
3  या दुखण्यात प्रचंड आग होते.
4  चमका येतात.
5  2 -3 दिवसानंतर लाल पुरळ येतात. नंतर ते फोड बनतात, आणि त्या फोडांमध्ये पाणी होते.
6  ज्या नसेवर ते फोड होतात त्या नसेची त्वचा लालसर होते. 
 
नागिणीने विळखा मारला, किंवा दोन तोंडे एकमेकांना जुळले की जीवास धोका असतो असे गैरसमज आहे. पण ह्यात काहीही तथ्य नाही. नागीण ही शरीराच्या एका बाजूस येते, काही वेळेस एकाच नसेवर हा आजार होतो. इतर वेळेस दोन-तीन किंवा अधिक नसांना ह्या आजाराची लागवणं लागू शकते. वेळेवर उपचार केल्यास रुग्ण पूर्ण पणे बरा होतो. या आजाराची लक्षणे दिसल्यास 
त्वरित 48 तासातच वैद्यकीय उपचार घेतल्यास रुग्ण 5 -7  दिवसांत पूर्णपणे बरा होतो.
 
काही जणांचा गैरसमज असतो की या आजारांवर औषधोपचार नाही त्यामुळे ते घरगुती किंवा अन्यत्र उपाय करतात. दूर्वा, जळालेले खोबरे, तांदळाचा लेप लावतात. त्यामुळे जखम चिघळते आणि आजार पसरतो, दुखणे लांबणीला जाते. त्रास वाढतो.
 
उपचार :-
1 नागीण झाल्याचे लक्षात आल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ल्याने औषधोपचार करावे.
2  गोळ्यांचा पूर्ण डोस घ्यायलाच हवा.
टीप :- गरोदरपणात हा रोग झाल्यास पण हे औषधे घेता येते. काही दुष्परिणाम होत नाही. 
 
या आजारात घ्यावयाची काळजी :-
1 जास्त दगदग टाळावी
2  हलका आहार घ्यावा
3  अंघोळी नंतर जागा टिपून घ्यावी
4  स्वतःचे कपडे, साबण, अंथरूण, पांघरुणं, वेगळे ठेवावे
5  स्वच्छता बाळगावी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

तुमचा पार्टनर लैंगिक स्वच्छतेची काळजी घेत नाही का? या समस्या उद्भवू शकतात, तज्ञ काय म्हणतात

घरात मैदा नाही का? गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत करंज्या बनवा

अंगणातील तुळशीचे रोप वाळू लागले का? उन्हाळ्याच्या हंगामात बहरत राहण्यासाठी या टिप्स अवलंबवा

National Science Day:राष्ट्रीय विज्ञान दिन

New flavors of Karanji; यंदाच्या होळीला पारंपारिक करंजीचे हे हटके फ्लेवर्स नक्की बनवून पाहा

पुढील लेख
Show comments