Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

होम आयसोलेशन मध्ये कोरोना रुग्णांनी स्वत:वर या प्रकारे घ्यावा उपचार, लवकरच बरे व्हाल

Webdunia
शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (07:16 IST)
आपल्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसल्यास आपण घरीच क्वारंटीन व्हा त्याच प्रकारे घरी राहून कशा प्रकारे यावर मात करता येईल त्यासाठी खास टिपा-
 
How to recover in home isolation
कोरोनावायरसचा उद्रेक पुन्हा देशभरात सुरू असून दररोज लाखोच्या संख्येत लोक याचे शिकार होत आहे. देशात दररोज वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे उपचारसाठी रुग्णालयांमध्ये बेड मिळणे अवघड झाले आहे. टेस्ट रिर्पोट उशिरा येत आहेत, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे, इंजेक्शन उपलब्ध नाहीये अशात माइल्ड लक्षणं असणार्‍यांनी घरी राहून उपचार घ्यावा. असा सल्ला डॉक्टर्सदेखील देत आहेत. जर आपल्याला माइल्ड लक्षणं जसे खोकला, ताप, घशात खवखवणे, शरीर वेदना, स्वाद न येणे, वास न येणे, भूक न लागणे असे जाणवत असेल तर लगेच आरटी-पीसीआर टेस्ट (RT-PCR Test) करुन घ्या. आणि रिर्पोटची वाट न बघता स्वत:ला क्वारंटाइन करुन घ्या. जर आपण हलक्या लक्षणं असलेल्या रुग्णांपैकी आहात तर Home Quarantine Treatment सुरु करा. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि घरगुती उपचार देखील सुरु ठेवून आपण लवकरच बरे होऊ शकता. जाणून घ्या कशा प्रकारे सावध राहून आपण स्वच:ची काळजी घेऊ शकता.
 
Corona Symptoms लक्षणं ओळखण्यात वेळ करु नका
फ्लू, व्हायरल आणि कोरोनाची सुरुवातीची लक्षणे जवळजवळ सारखीच आहेत. अशात अनेक लोक व्हायरल समजून टेस्ट करवत नसल्याने स्थिती वाईट होते. आपण असे करुन नये. जर आपल्याला दोन दिवसापासून 100 डिग्री ताप आहे, खोकला किंवा घशात खवखरू आहे, घशाला खाज सुटतेय, शरीरात वेदना जाणवताय, तोंड कडु वाटतंय, वास येत नाहीये किंवा जेवण्याचा स्वाद नाही तर उशिर न करता कोरोना टेस्ट करवावी. हे लक्षण दिसल्यावर लगेच घरात देखील मास्क लावणे सुरु करा आणि स्वत:ला आयसोलेट करा ज्याने कुटुंबातील इतर सदस्यांना याचं इन्फेशन होण्यापासून वाचवता येईल.
 
Self Isolation सेल्फ आयसोलेशनमध्ये काळजी घ्या
आपल्याला कोविडचे लक्षण दिसल्यानंतर घाबरण्याची गरज नाही आणि रुग्णालयात दाखल होण्याची घाई देखील करु नका. सध्या रुग्णालयांची स्थिती चांगली नाही. त्यापेक्षा घरीच उपचार घ्या. आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्या, त्यांनी सांगितलेल्या औषधांचा वेळेवर सेवन करा. घरातून ‍बाहेर पडू नका. जेव्हा आपल्या ऑक्सिजनची पातळी 92 च्या खाली होत असताना जाणवत असेल तर डॉक्टरांशी संपर्क करा. होम आयसोलेशनची कालावधी पूर्ण 14 दिवसांची असते, जी आपल्याला पूर्ण करायची असते. बरं वाटतं असलं तरी 9-10 दिवसाने उठून घरात इतर खोलीत फिरणे किंवा घराबाहेर जाण्याने आपण दुसर्‍याला धोक्यात टाकत आहात हे विसरु नका. घरातील सर्व सदस्यांशी सोशल डिस्टेंसिंग ठेवा. आपली देखभाल करत असणार्‍याने मास्क, ग्लव्ज घालावा हे सुनिश्चित करा.
 
घरात या गोष्टींकडे लक्ष द्या
आपल्यासाठी खोली निर्धारित करुन तेथेच रहा. शक्योतर आपण वापरत असलेलं टॉयलेट इतर कुणी वापरुन नये याची काळजी घ्या. स्वत:चे कपडे स्वत: धुवा किंवा शक्य नसेल तर एका ठिकाणी वेगळे ठेवून द्या. खोलीतील खिडक्या बंद करु नका. आपली भांडी, चादर, औषध, वापरण्याच्या वस्तू वेगळ्या ठेवा. आपला मास्क बदलत राहा. स्वत:च्या खोलीची स्वच्छता स्वत: करा. वारंवार सॅनिटायजर वापरा.
 
Diet कोरोना संक्रमित असल्यावर या प्रकारे असावा आहार
आपण कोरोना संक्रमित असाल तर मसालेदार, मैदा, जंकफूड, या वस्तू मुळीच खाऊ नका. घरात तयार सात्विक आहार घ्या. दिवसभर खूप लिक्विड आहार घ्या. भरपूर प्रमाणात पाणी प्या. पाणी कोमट असल्यास अधिकच उत्तम. कुठलेही थंड पदार्थ खाऊ नका. गरभ लिंबू पाणी, काढा, आलं घातलेला चहा, आंबट फळांचा रसाचे सेवन करा. अल्कोहल आणि स्मोकिंग पासून लांब राहा. सांजा, खिचडी, वरण, हिरव्या भाज्या, अंडी, फळ भरपूर प्रमाणात घ्या. औषधं वेळेवर घ्या. दोन ते तीन वेळा गुळण्या करा आणि वाफ घेणे विसरु नका.
 
डॉक्टरांच्या सल्ला घ्या
जर आपल्याला कोरोनाचे गंभीर लक्षणं जसे श्वास घेण्यात त्रास होणे, छातीत वेदना, शरीरात ऑक्सिजन लेवल 90 पर्यंत जाणे, बोलण्यता त्रास जाणवणे, विसर पडणे, असे लक्षणं दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि रुग्णालयात दाखल व्हा. 
 
या प्रकारे आपण काळजी घेतली तर स्वत:ही सुरक्षित राहाल आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा धोकाही टळेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

गुंतलेले आणि फ्रिज़ी केसांना मऊ करण्यासाठी हे 3 हेअर मास्क वापरा

हे 3 जपानी रहस्य तुम्हाला लठ्ठपणापासून नेहमी दूर ठेवतील

ऑफिसच्या खुर्चीवर बसून करा ही 3 योगासने, लठ्ठपणा लगेच कमी होईल

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

प्रॉन्स फ्राय: मसालेदार कोळंबी रेसिपी

पुढील लेख
Show comments