Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खसखसचा हलवा खाण्याचे सात फायदे

Webdunia
गुरूवार, 15 फेब्रुवारी 2024 (07:00 IST)
खसखसचे फायदे- खसखस ही आरोग्यासाठी चांगली असते. थंडीच्या दिवसात खसखसला सेवन केल्याने प्रोटीन, ओमेगा-6 फैटी एसिड, फाइबर, कॅल्शियम मिळते. खसखसमध्ये फाइटोकेमिकल्स, विटामिन बी, थायमिन, आणि मॅगनीज असते. खसखस ही रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी तिला बारीक करून मग दुधात टाकून सेवन करणे किंवा हलवा बनवणे. चला जाणून घेऊ या खसखसचा हलवा खाण्याचे फायदे. 
 
1. बद्धकोष्ठता दूर करते-
खसखस फायबरचे चांगले स्त्रोत आहे. खसखस सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही. ही पाचन क्रियेला चांगल्या पद्धतीने संचालित करते. तसेच छोट्या छोट्या समस्या जसे की अधिक तहान लागणे, ताप, सूजने तसेच पोटात होणारी जळजळ यांपासून आराम मिळण्यासाठी खसखस उपयोगी असते. 
 
2. मेंदूला फ्रेश ठेवते-
खसखसचा हलवा तुमच्या मेंदूला फ्रेश ठेवतो. खसखसचा हलवा सर्व प्रकारच्या डोक्याच्या दुखण्यापासून आराम देतो. कारण यात ओमेगा-6 असते. खसखस मानसिक तणाव पासून मुक्ति देते.
 
3. वेदना कमी करते- 
खसखस ही शारीरिक वेदना देखील कमी करते. कारण यात असलेले ओपियम एल्कलॉइड्स सर्व प्रकारचे दुखणे दूर करायला मदत करते. मांसपेशीमध्ये किंवा गुडग्याचे दुखणे पण खसखसने दूर होते.
 
4. त्वचेला तरूण ठेवते-
खसखसच्या सेवनाने चेहऱ्यावर चमक रहाते. खसखस सेवनाने चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाही. हे अँटीएजिंगचे काम करते. थंडीच्या दिवसात एक दिवस सोडून सेवन करणे. तसेच यात अँटीऑक्सीडेंट्स भरपूर मात्रामध्ये असते. जे तुम्हाला तरूण ठेवण्यात मदत करते. तसेच खसखस त्वचेतील ओलावा टिकून ठेवते. तसेच त्वचेवरील खाज आणि जळजळणे कमी करते तसेच एक्जिमा सारख्या समस्यांशी लढायला मदत करते. 
 
5. श्वास संबंधित समस्या दूर करते- 
खसखस सेवन केल्याने श्वास संबंधित आजार दूर होतात. तसेच खोकला देखील कमी करते खसखसच्या सेवनाने श्वास संबंधित समस्या पुन्हा पुन्हा निर्माण होत नाही. 
 
6. किडनीस्टोन- किडनीस्टोन दूर करण्यासाठी देखील खसखसचा उपयोग करू शकतो. यात असलेले 
ओक्सलेट्स शरीरात असलेले अतिरिक्त कॅल्शियमचे अवशोषण करून किडनी स्टोन होण्यापासून थांबवते. 
 
7. निद्रानाश- जर तुम्ही झोप येत नाही म्हणून चिंतित असाल तर झोपण्यापूर्वी खसखसचे दूध सेवन करणे किंवा  हलवा सेवन करणे. हे निद्रानाशची समस्या दूर करते व तुम्हाला झोपण्यासाठी प्रेरित करते. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik 

 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महिलांनी स्तनपान करताना ब्रा घालणे योग्य आहे की नाही?जाणून घ्या

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

पुढील लेख
Show comments