Marathi Biodata Maker

पावसाळ्यात या वस्तूंपासून राहा दूर

Webdunia
बुधवार, 12 जुलै 2023 (09:16 IST)
Stay away from these items during monsoonsकडक उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू झाला की तन आणि मन दोन्ही ताजेतवाने होऊन जातात. पण पावसाळा एकटाच येत नसून आपल्याबरोबर आणतो खूप सारे आजार. म्हणूनच जर आपल्याला चटर-पटर खाण्याची सवय असली तरी पावसाळ्यात या गोष्टींपासून लांब राहणच बरं. या दिवसांमध्ये पोट नाजुक होऊन जातं ज्याने जेवण नीट पचत नाही आणि बाजारातील फास्ट फूड खाल्ल्याने आजार पसरण्याची भीती वाढते. शक्योतर पावसाळ्यात या गोष्टींपासून लांब राहा:
 
भजी: पावसाचे थेंब आले की गरमागरम भजी आणि चहा आठवतो. तेलात तळलेली भजी पचवण्यासाठी कठीण असतात ज्याने आपले पोट खराब होऊ शकतं म्हणून पावसाळ्यात बाजारातील भजी खाणं टाळा.
चाट: चटकारे घेऊन चाट खायला कोणाला आवडतं नाही. प्रत्
येक गल्लीच्या कोपर्‍याला लागणारे चाटचे ठेले आकर्षित करतात पण हे बनविण्यासाठी वापरले जाणारे पाणी, चटणी आणि बटाटे आपल्या तब्येती वर वार करू शकतात
पाणी पुरी: या दिवसांमध्ये पाणी पुरी मुळीच खाऊ नये. यात वापरण्यात येणार्‍या पाण्यात भरपूर जिवाणू असतात. ज्याने आपल्याला उलट्या, अतिसार, पोटातील वेदना, भूक न लागणे, आणि टायफॉइड सारखे रोग होऊ शकतात.
चायनीज फूड: रस्त्याचा बाजूला लागणारे चायनीज फूडचे ठेले आपल्याला स्वस्त डिश सर्व्ह करत असले तरी ते नूडल्स किंवा राईस उकळवण्यासाठी वापरण्यात येणारं पाणी घाण असतं.  यात घातले जाणारे तेल, अजीनोमोटो आणि सॉसेस आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
कच्ची कोशिंबीर: या दिवसात हिरव्या पालेभाज्या कोशिंबीरमध्ये घालू नये. यात सूक्ष्म कीट असतात. हे खाण्याने पोटाचा संसर्ग होऊ शकतो.
फळांचा रस: ज्यूस पिणं आरोग्यासाठी चांगलं असलं तरी या दिवसात फळ लवकर खराब होतात म्हणून बाजारात ज्यूस पिणे टाळा आणि आधीपासून कापून ठेवलेले फळं ही खाऊ नका. कापून ठेवलेली उघड्यावरची फळे खाल्ल्याने जुलाब व संक्रमण होण्याची शक्यता असते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

फेब्रुवारीतच जाणवतोय एप्रिलचा चटका? उन्हाळ्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी आहारात करा हे ५ बदल

Kunafa अस्सल मिडल इस्टर्न चवीचा कुनाफा: आता आपल्या किचनमध्ये!

हृदय विकार टाळण्यासाठी टोमॅटोचे फायदे जाणून घ्या

इंडस्ट्रियल डिझायनिंग मध्ये करिअर करा

गोरी त्वचा मिळवायची असेल तर हे घरगुती उपाय अवलंबवा

पुढील लेख