rashifal-2026

दाद ... खाज... खुजली....

Webdunia
गुरूवार, 27 फेब्रुवारी 2020 (18:08 IST)
शीर्षकावरून लक्षात आलेच असेल की, या लेखाद्वारे आपण सर्वसाधारणपणे लोक ज्याला जला नायटा, दाद अथवा गजकर्ण संबोधतात अशा बुरशीजन्य संसर्गाबाबत माहिती घेणार आहोत. याचे सर्वसाधारण प्रकार - रिंगवर्म, अ‍ॅथलेटस्‌ फूट व जॉक इच आहेत.
 
* रिंगवर्म - यामध्ये गोलाकार लालसर चट्टे उमटतात. हे कुठल्याही कृमीमुळे होत नाही.
* अ‍ॅथलेटस्‌ फूट - पायाच्या बोटांमध्ये खाज, आग अथवा चिरा आढळतात.
* जॉक इच - यामध्ये मांड्याच्या आतील बाजूस लालसर खाजवणारे चट्टे उमटतात.
 
सर्वसाधारणपणे उन्हाळा व पावसाळा या दोन ऋतूंमध्ये हाआजार उद्‌भवतो. मागील वर्षभरात या आजारात बरीच वाढ झालेली आढळून येते. हा एक संसर्गजन्य आजार आहे व त्वचेच्या स्वच्छतेशी याचा संबंध येतो. हा आजार जास्त धोकादायक नसला तरी त्रासदाक आहे. वेळीच उपचार न केल्यास सामाजिक व मानसिक आरोग्य धोक्यात येते. यासाठी पुढील काळजी घेणे गरजेचे आहे.
 
काय करावे?
* नियमितपणे हात स्वच्छ धुवावेत.
* आंघोळीनंतर स्वच्छ टॉवेलने शरीर पूर्ण कोरडे करावे.
* जननांगाजवळील त्वचा स्वच्छ व कोरडी ठेवावी.
* अंतवस्त्रे उलटी करून त्यांना इस्त्री करून ती वापरावीत.
* खेळून आल्यावर अथवा श्रमाची कामे केल्यानंतर आपले कपडे व अंतवस्त्रे धुवून टाकावीत.
* तसेच घाम जास्त येत असल्यास दिवसातून दोनवेळा आंघोळ करावी.
* कपडे उन्हात वाळवून वापरावेत. सैलसर व कॉटनचे कपडे वापरावेत.
* नखे योग्य आकारात लहान ठेवावीत.
* नखांच्या क्युटिकलना (बाजूची त्वचा) मॉईश्चरायजर लावावे.
* सॉक्स शक्यतो कॉटनचे, हवा खेळती राहील असे वापरावेत. नियमित बदलावेत.
* पाय कोरडे ठेवावेत.
* दादची लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरी सल्ल्याने उपचार करावेत.
काय करू नये ?
* एकमेकांचे टॉवेल,बेडशीट, कपडे, कंगवे, शूजचा वापर करू नये.
* वैयक्तिक स्वच्छतेचे सामान इतरांबरोबर वापरू नये. घट्ट फिटिंगची अंतर्वर्स्त्रे तसेच पॅन्ट अथवा लेगीन्स घालू नये.
* केशरहित, चट्टेु्युक्त प्राण्यांना हात लावू नये. लोकरीचे कपडे, नालॉनचे कपडे बर्‍याच काळासाठी घालणे टाळावे.
* ज्या सॉक्समुळे पायाला घाम येईल, असे सॉक्स अथवा पादत्राणे घालू नयेत. 
* ओले कपडे कपाटात ठेवू नये व घालूही नये.
* क्यूटिकलना कापू नये.
* नखांचा वापर हत्यारासारखा (उदा. टिन उघडणे वगैरे) करू नये.
* स्पोर्टस्‌ चेंजिंग रूम अथवा सार्वाजनिक जलतरण तलावाजवळ उघड्या पायांनी फिरू नये. संसर्ग झाल्यास नखांनी खाजवू नये.
* सार्वजनिक स्नानघर व शौचालयाचा वापर टाळावा.
* संसर्ग झाल्यास जिम, जलतरण तलाव आदी ठिकाणी जाऊ नये.
* स्वऔषधी उपचार घेणे टाळावे.
अशा पद्धतीने काळजी घेतल्यास रशीजन्य संसर्गापासून तुमचा बचाव होईल. परंतु जर हा संसर्ग झाल्यास  तर योग्य तज्ज्ञांकडून यावर उपचार करावेत. बरचवेळ्या खाज अथवा लालसरपणा कमी झाला की, रुग्ण मनानेच औषधे बंद करतात. अथवा पुनर्परिक्षणासाठी डॉक्टरांकडे जात नाहीत. त्यामुळे  हा आजार अधिक बळावण्याची शक्यता असते.
 
उपचारांमध्ये विविध क्रीम्स, साबण, पावडर, पोटातून घेण्याची औषधे यांचा समावेश असतो. डॉक्टरी   सल्ल्याने योग्य उपचाराने या संसर्गापासून तुमची सुटका होऊ शकते. अशा पद्धतीने त्वचेची काळजी घेतल्यास बुरशीजन्य संसर्गापासून आपला बचाव होऊ शकतो. या संसर्गाला तुमच्या जीवनावर हावी होऊ देऊ नका. 
डॉ. तृप्ती राठी 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

आरोग्यदायी रेसिपी झटपट बनवा मखाना पराठा

Top 100 Marathi Baby Boy and Baby Girl Names टॉप 100 मराठी बेबी बॉय आणि बेबी गर्ल नावे

Mahatma Gandhi Punyatithi 2026 Speech in Marati महात्मा गांधी पुण्यतिथी भाषण मराठी

बोर्ड परीक्षेच्या अभ्यासासोबतच CUET ची तयारी कशी करावी?

Marathi Essay प्लास्टिकमुक्त भारत: एक संकल्प की केवळ घोषणा?

पुढील लेख