Marathi Biodata Maker

फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी या 5 गोष्टी नियमित वापरा

Webdunia
सोमवार, 22 मार्च 2021 (17:00 IST)
फुफ्फुस शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. फुफ्फुस निरोगी असल्यावर अनेक आजार उद्भवतात. जसे की दमा,न्यूमोनिया,क्षयरोग,फुफ्फुसांचा कर्करोग इत्यादी, म्हणून फुफ्फुसांची काळजी घेणं महत्त्वाचे आहे. आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून आपण फुफ्फुसांना निरोगी ठेवू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहार- 
आंबट फळे जसे- संत्री,लिंबू, टोमॅटो,किवी,स्ट्रॉबेरी,द्राक्षे,अननस,आंबे या मध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहाराचा सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात. व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहारात अँटी ऑक्सीडेन्ट असतात, जे श्वास घेल्यावर ऑक्सिजन सर्व अवयवांमध्ये पोहोचतात. 
 
2 लसणाचा सेवन -लसणाचे सेवन केल्याने कफ नाहीसा होतो. जेवल्यानंतर लसूण खालले तर हे छाती स्वच्छ ठेवतो. लसणात अँटीऑक्सीडेंट असतात जे संसर्गाविरुद्ध लढतात आणि शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात.  
 
3 लायकोपिन समृद्ध आहाराचे सेवन- अन्नात असे आहार घ्यावे जे लायकोपिनने  समृद्ध असावे जसे गाजर,टोमॅटो ,कलिंगड,पपई,बीटरूट आणि हिरव्यापालेभाज्या. अशा प्रकारच्या आहारात केरोटीनॉयड अँटीऑक्सीडेंट असते. जे दमापासून बचाव करण्यात मदत करते, तसेच हे खाल्ल्याने फुफ्फुसांचा कर्करोगाचा धोका कमी होतो.  
 
4  मनुकाचे सेवन- दररोज भिजत घातलेले मनुकाचे सेवन केल्याने फुफ्फुस बळकट होतात आणि त्यांची रोगांशी लढण्याची प्रतिकारक शक्ती देखील वाढते. 
 
5 तुळशीच्या पानाचे सेवन -फुफ्फुसांमध्ये कफ साचला असल्यास कफ काढण्यासाठी तुळशीचे कोरडे पान, काथ,कपूर आणि वेलची सम प्रमाणात मिसळून वाटून घ्या. आता या मध्ये नऊ पटीने साखर मिसळून दळून घ्या. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा खा. या मुळे फुफ्फुसातील जमलेला कफ दूर होईल. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडती डिश Hotel-like delicious Manchurian Rice Recipe

श्वेतप्रदरात या ५ गोष्टी खाणे टाळा, समस्या वाढू शकते

Career in Loco Pilot: लोको पायलट कोर्समध्ये कॅरिअर करा, पात्रता, पगार जाणून घ्या

तेलकट त्वचा आता तुम्हाला त्रास देणार नाही; या ५ सोप्या टिप्स अवलंबवा

शरीरात पित्त वाढल्यावर त्वचेपासून पोटापर्यंत ही लक्षणे दिसतात

पुढील लेख
Show comments