Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

असा असावा थंडीतला आहार

Webdunia
हिवाळ्यात आपल्या आहार विहाराच्या सवयी बदलतात. या बदलांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. आहारातल्या बदलांमुळे आपलं वजनही वाढू शकतं. हिवाळ्या आपल्या शरीरातही अनेक बदल होतात. या दिवसात आपलं आरोग्य टिकवण्यासाठी गरज असते ती पोषक आहाराची. थंडीत शरीराचं तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीर जास्त ऊर्जा वापरतं. त्यामुळे सतत भूक लागते. सतत भूक लागल्याने आपण गरजेपेक्षा जास्त खातो. म्हणूनच आहाराकडे जास्त लक्ष द्यायला हवं. तर पाहू या थंडीत कोणता आहार योग्य ठरतो ते.....



* थंडीत मिळणारे लाल गाजर, नवलकोल अशा भाज्या पौष्टिक तर अस्ताचाचं पण त्यामुळे थंडीपासून रक्षणही होतं. थंडीतल्या सर्दी, खोकला, फ्लू अशा आजारांना या भाज्यांच्या सेवनाने दूर ठेवता येतं.

* ग्रीन टीचं सेवनही थंडीत उपयुक्त ठरतं. कारण ग्रीन टीमध्ये भरपूर अँटी अॅक्सिडंट्स असतात. यामुळे अनेक बॅक्टेरियांचा प्रभाव कमी होतो. तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढायला अँटीअॅक्सिडंट मदत करतात.


 
हिवाळ्यात लसूण खाणं चांगलं. लसणामुळे शरीराला ऊर्जा मिळते तसंच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.


* गरम दुधात मध घालून प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. थंडीत दुधात सारखाऐवजी मध घालावा.


 
हिरव्या भाज्यांमधली अ आणि क ही जीवनसत्त्वं थंडीत आरोग्यासाठी लाभदायी ठरतात.


* संत्री, द्राक्षं अशी फळांमध्ये क जीवनसत्त्वं असतं. यामुळे त्वचेचं पोषण होतं. कोलेस्टरॉल कमी करण्यासोबतच ही फळं चयापचय क्रिया ही वाढवतात.


 
या दिवसात प्रथिनयुक्त आहार घ्यावा. ब्रेड, पांढरा भात असे पदार्थ टाळावे.

* गोड पदार्थ, शीतपेय, दुग्धजन्य पदार्थ याचं सेवनही प्रमाणातच करावं. सर्दी, खोकला असेल तर दुग्धजन्य पदार्थ टाळावेत.


 
तेलकट पदार्थांच सेवनही टाळावं.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments