Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पिकलेल प्रेम

Webdunia
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (12:27 IST)
कधीही सगळयानसमोर आजीचा हाथ हाथात न घेतलेले आजोबा ,
 
आजीच्या हाथदुखीच आयुर्वेदिक औषध मात्र पहाटे ४ वाजल्या पासून वाटतात, 
 
आणि आजी उठल्या उठल्या  "यांना" चहा लागतो अस म्हणत दुखरया हाथानेच चहा टाकते.
 
आबांनी जेवणात लोणच मागितल की डॉक्टर आजी B.P च्या गोष्टी सांगते आणि उन्हाळ्यात मात्र आजोबांच्या आवडीच गोडलिबांचच लोणच घालते  
 
एरवी दोनच पोळ्या खाणारे आबा "भाजी चांगली झाली आहे" हे न सांगता "आणि एक पोळी वाढ ग" म्हणून पसंतीची पोचपावती देतात आन फुगलेली पोळी वाढताना आजी  हळूच लाजते. 
 
बाहेरून येताना पालकाच्या जुडीखाली एक मोगरयाची माळ लपलेली असते, अन " केस कुठे उरलेत आता" अस म्हणत त्या विरळ झालेल्या आंबाड्याच वजन, आजी पांढरी माळ 'गुलाबी' होत मळून, वाढवत असते. 
 
आजीने पहिल्यांदा दिलेल्या क्यासेट मधली गाणी आ बा आजही चोरून ऐकतात, अन आबांनी आजी ला लिहिलेलं पत्र कधीतरी तिच्या शालुतुन डोकावताना दिसत 
आजही आजोबांचे मित्र आले की  आजी आत जाते आणि न सांगता भजीची बशी सगळ्यांसमोर येते. 
 
भाजी आणायला जेंव्हा आजी आजोबा बागेजवळच्या मंडइत जातात येताना कधी कधी मातीचे छपे धोतरावर घेऊन येतात. 
 
भांडण झाल दोघांच्यात की घरी  दुधीची भाजी बनते, पण आजोबांचा पडलेला चेहरा पाहून आजी मला मुरांब्याची बरणी आणायला पळवते. 
कधीतरी आबा मुद्दामून मला मधुबालाच्या सौंदर्याच्या कथा सांगतात अन तिरप्या नजरेने आपल्या अनारकलीकडे पाहतात, मग आजीपण खट्याळ हसते आणि कपाटातुन राजेशखनाच्या फोटो वरची धूळ पुसते 
 
दिवाळीला ओवाळताना आजीच्या नजरेत अजूनही तितकच कौतूक असत आणि त्या डोळ्यांकडे पाहत आपला वाकलेला कणा सावरत  आबा पण ताठ बसतात 
 
आजी आजारी पडली की मात्र आजोबांची चिडचिड वाढते आणि आजोबांकडून औषध घेताना आजी आजारपणातही लाजते 
 
आजारपणमात्र सोडत नाही आणि आजीचा त्रास आजोबांना बघवत नाही, मग ती झोपली की आजोबा हळूच तिचे पाय चेपतता अन आजीच्या बंद डोळ्यातून आश्रू घरंगळत उशीला भेटतात 
 
पिकलेल्या लोणच्याला आता बरणीपासून दुरावा सहन होत नाही 
अन बरणीला पण लोणच्याशिवाय आता करमत नाही...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments