Marathi Biodata Maker

माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी

Webdunia
मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (10:17 IST)
कापड दुकानातले नोकर लोक हे गेल्या जन्मीचे (आणि या जन्मातले ही) योगी असतात अशी माझी ठाम श्रद्धा आहे. 
बनारसी शालू आणि राजापुरी पंचा एकाच निर्विकार मनानं दाखवतात. कसलाही आग्रह नाही. 
 
लुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात पण चेहर्‍यावरची घडी मोडू देत नाहीत. 
 
बायका काय वाटेल ते बोलतात. "शी ! कसले हो हे भडक रंग.!"
लुगड्याच्या दुकानातील माणूस संसारात असून नसल्या सारखा चेहरा करुन असतो. निष्काम, निरहंकारी चेहरा.! 
समोरची बाई म्हणत असते,"कसला हा भरजरी पोत.!" हा शांत. 
गिऱ्हाईक नऊवारी काकू असोत, नाही तर पाचवारी शकू असो, ह्याच्या चेहऱ्यावर शुकासारखे पूर्ण वैराग्य असते. 
समोर शेपन्नास साड्यांचा ढीग पडलेला असतो, पण एखाद्या चित्रकला प्रदर्शनातला मेणाचा माणूस बोलावा, तसा अठरा रुपये, तेवीस बारा, बेचाळीस अश्या किमती हा गृहस्थ, 
अथोक्षजाय नम:।
अच्युताय नम:।
उपेंद्राय नम:। 
नरसिंहाय नम:।
ह्या चालीवर सांगत असतो.
 
सगळा ढीग पाहून झाला तरी प्रश्न येतोच, "ह्यातलं लेमन कलर नाही का हो एखादं.?"
एक वेळ तेराला तीनानं पूर्ण भाग जाईल; पण लुगड्याची खरेदी आटोपली तरी एखाद्या प्रश्नाची बाकी उरतेच. 
आपली स्वतःची बायको असून सुद्धा आपल्याला तिच्या चेंगटपणाची चीड येते. 
पण कापड दुकानातले ते योगीराज शांतपणं म्हणतात, "नारायण, इचलकरंजी लेमन घे !
 
खरेच, माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी.
 
-- पु. ल. देशपांडे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

सुपरस्टार मोहनलाल यांच्या आईचे निधन

New Year 2026 परंपरा, निसर्ग आणि आधुनिकतेचे मिश्रण असलेली ही ठिकाणे आहे सकारात्मकतेचा भौगोलिक स्रोत

पुढील लेख
Show comments