rashifal-2026

'ळ' अक्षर नसेल तर.....

Webdunia
'ळ' हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी...!!!
 
आणि म्हणूनच ह्या भाषेच्या समृद्धतेचा आम्हाला गर्व आहे!
 
'ळ' अक्षर नसेल तर
 
पळणार कसे
वळणार कसे
तंबाखू मळणार कसे
दुसर्‍यावर जळणार कसे
भजी तळणार कशी
सौंदर्यावर भाळणार कसे
 
पोरं-टोरं तळयात-मळ्यात खेळणार कशी
 
तीळगूळ कसा खाणार ?
टाळे कसे लावणार ?
बाळाला वाळे कसे घालणार
खुळखुळा कसा देणार
घड्याळ नाही तर 
सकाळी डोळे कसे उघडणार ?
घड्याळ बंद पडले तर पळ कोण मोजणार
वेळ पाळणार कशी ?
मने जुळणार कशी ?
खिळे कोण ठोकणार ?
 
तळे भरणार कसे ?
नदी सागरला मिळणार कशी ?
मनातली जखम भळाभळा वाहणार कशी
हिवाळा,उन्हाळा, पावसाळा
नाही उन्हाच्या झळा
नाही त्या निळ्या आभाळातून पागोळ्या खळाखळा !
 
कळी कशी खुलणार ?
गालाला खळी कशी पडणार ?
फळा, शाळा मैत्रिणींच्या 
गळ्यात गळा
सगळे सारखे, कोण निराळा?
 
दिवाळी, होळी सणाचे काय ?
कडबोळी,पुरणपोळी 
ओवाळणी पण नाही ?
 
तुम्ही काय चिंचपोकळीला रहाता ?
 
भोळा सांब ,
सावळा श्याम
जपमाळ नसेल तर 
कुठून रामनाम ?
 
मातीची ढेकळे नांगरणार कोण?
ढवळे पवळे बैल जोततील कोण?
पन्हाळ्याची थंड हवा खाणार कोण ?
 
निळे आकाश,
पिवळा चाफा
माळ्याच्या कष्टाने फळा फुलांनी बहरलेला मळा !
 
नारळ, केळ, जांभूळ, आवळा,
 
नवर्‍याला बावळट बोलणार कसे
 
काळा कावळा, 
पांढरा बगळा
 
ओवळ्या बकुळीचा गजरा माळावा कसा
 
अळी मिळी गुपचिळी,
बसेल कशी दांतखिळी?
 
नाही भेळ, 
नाही मिसळ
नाही जळजळ
नाही मळमळ
नाही तारुण्याची सळसळ
 
पोळ्या लाटल्या जाणार नाहीत 
टाळ्या आता वाजणार नाहीत !
जुळी तीळी होणार नाहीत !
बाळंतविडे बनणार नाहीत !
तळमळ कळकळ वाटणार नाही !
काळजी कसलीच उरणार नाही !
 
पाठबळ कुणाचे मिळणार नाही
सगळेच बळ निघून जाईल,
 
काळ आला होता पण वेळ आली नव्हती
 
पण काहीच कळेनासे होईल 'ळ' शिवाय !

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

2026 मध्ये ‘मर्दानी 3’पासून राणी मुखर्जी साजरे करणार आपल्या शानदार कारकिर्दीची 30 वर्षे

इंडियन आयडल सीझन 3 चा विजेता प्रशांत तमांग यांचे निधन

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाची पहिली झलक शेअर केली, त्याचे नाव सांगितले

ओ रोमियो' चा टीझर प्रदर्शित, शाहिद कपूर एका भयंकर अवतारात दिसला

धुरंधरच्या विक्रमी यशानंतर, रणवीर सिंग 'प्रलय' मध्ये झोम्बी अवतार साकारण्यास सज्ज

सर्व पहा

नवीन

अभिनेते जितेंद्र आणि तुषार कपूर यांनी मुंबईतील ११ मजली व्यावसायिक इमारत ५५९ कोटींना विकली

Election Joke निवडणुकीच्या काळात नेत्याला चावून घरी आलेला डास

मर्दानी 3 ची खलनायक अम्मा यांनी खळबळ उडवून दिली, प्रेक्षक थक्क झाले

बॉर्डर 2 : 23 जानेवारी 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार

भारतातील रहस्यमय मंदिरे जी रात्री उघडतात, जिथे अंधारात दर्शन घेणे एक अद्भुत क्षण

पुढील लेख
Show comments