Dharma Sangrah

आणि दुःख confuse होतं....

Webdunia
गुरूवार, 16 ऑगस्ट 2018 (11:07 IST)
त्रासाने भरलेल्या खोक्यावर
मी "आनंद"असं लिहिते
...आणि दुःख confuse  होतं
 
येणाऱ्या प्रत्येक संकटाला
एक छानशी smile देते
...आणि दुःख confuse होतं
 
खरं सांगायचं तर खूप वेळा
मी कोलमडून जाते
सगळं संपलं असं वाटून
अगदी गर्भगळीत होते
कुठूनतरी देव येऊन
माझ्या हातात त्याचा हात देतो
...आणि दुःख confuse होतं
 
संकटाच काय? ती येणारच
आल्यावर थोडं फार छळणारच
आपण स्थिर राहायचं काही काळ
संकटाचं पाणी पाणी होणारच
आलेलं संकट हसता हसता
नकळत नाहीसं होतं
...आणि दुःख confuse होतं
 
किती दिवसाचं हे आयुष्य
आज ना उद्या संपणारच
अमुक आहे-तमुक नाही 
आपलं चालू राहणारच
फाटक्या गोधडीत पाय आखडून
मी सुखाने झोपी जाते
...आणि दुःख confuse होतं
 
म्हटलं तर जीवन सुंदर 
म्हटलं तर वाईट आहे
मग त्याला सुंदर म्हणण्यात 
सांगा काय वाईट आहे? 
जीवनाकडे बघण्याचा
मी चष्मा विकत घेते
...आणि दुःख confuse होतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्मेंद्र यांच्या मृत्युपत्रातून उघड झाले मोठे रहस्य: मुलांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळाला नाही

माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सिद्धांत चतुर्वेदी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्ही. शांतारामची भूमिका साकारणार, पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

बॉर्डर 2' मधील दिलजीत दोसांझचा पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

श्रेयस अय्यर मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात

सर्व पहा

नवीन

बिग बॉस 19 च्या अंतिम फेरीत सलमान खान भावुक, धर्मेंद्र यांची आठवण येताच अश्रू अनावर

धर्मेंद्र यांना पहिल्यांदाच पुरस्कार मिळाल्यावर डोळ्यातून आनंदाश्रू आले

FA9LA' ने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला, धुरंधर'मधील अक्षयची एन्ट्री व्हायरल

ज्येष्ठ अभिनेते कल्याण चॅटर्जी यांचे वयाच्या 81व्या वर्षी निधन

अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता

पुढील लेख
Show comments