Marathi Biodata Maker

'पप्पा मी तुम्हाला कधी रडवलंय का?'

Webdunia
गुरूवार, 22 नोव्हेंबर 2018 (18:10 IST)
माझी मुलगी मोठी झाली.
एके दिवशी सहज म्हणाली,
 
'पप्पा मी तुम्हाला कधी रडवलंय का?'
 
मी म्हटलं, 
'का रे पिल्लू असं का विचारतेस?'
 
ती : 'काही नाही असंच.'
 
मी : 'नीट आठवत नाही. पण एकदा '
 
ती : 'कधी?' 
तिनं अधिरतेनं विचारलं.
 
मी म्हणालो, 'तू एक वर्षाची असताना मी तुझ्यासमोर पैसे, पेन आणि खेळणं ठेवलं. 
कारण मला बघायचं होतं की, 
तू काय उचलतेस?
 
तुझी निवड ठरविणार होती की, 
मोठेपणी तू कशाला जास्त महत्व देतेस.
 
जसे 
पैसे म्हणजे संपत्ती, 
पेन म्हणजे बुद्धी 
आणि 
खेळणं म्हणजे आनंद.
 
मी हे सर्व सहजच पण उत्सुकतेने करत होतो.
 
मला बघायची होती तुझी निवड.
 
तू एकाच ठिकाणी बसून आळीपाळीने सर्व गोष्टींकडे बघत होतीस 
आणि 
मी तुझ्या पुढ्यातच बसून शांततेने तुझ्याकडे पहात होतो.
 
तू रांगत-रांगत पुढे आलीस.
मी श्वास रोखून पहात होतो 
आणि 
क्षणार्धात तू त्या सगळ्या वस्तू बाजूला सारून माझ्या मिठीत शिरलीस.
 
माझ्या लक्षातच नाही आलं की,
'या सगळ्यांबरोबर मीसुद्धा एक निवड असू शकतो.'
 
ती पहिली वेळ होती जेव्हा तू मला रडवलंस.
 
खास मुलींच्या पप्पांसाठी.
खरंच मुलगी पाहिजेच. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

Adventure Games हे साहसी खेळ अगदी कोणत्याही वयात अनुभवता येतात

अभिनेत्री नंदिता पाटकर विवाहबंधनात: मराठमोळ्या लूकने जिंकली चाहत्यांची मने; पाहा लग्नाचे खास फोटो आणि तिचा जोडीदार कोण?

लोकांनी 'भूत बंगला'वर प्रेमाचा वर्षाव केला, ट्रेलर यूट्यूबवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड झाला

अभिनेत्री झरीन खान यांच्या आईचे निधन

राजपाल यादव यांच्यावर केलेल्या विनोदामुळे ते नाराज झाल्यानंतर, सौरभ द्विवेदी यांनी स्पष्टीकरण दिले

पुढील लेख
Show comments