Dharma Sangrah

तीची पर्स

Webdunia
गुरूवार, 29 नोव्हेंबर 2018 (12:17 IST)
तिच्या पर्समधून मोबाईल ची रिंगटोन वाजत होती.
ती शाळेतून नुकतीच येऊन चहा करत होती.. 
"फोन रिसिव्ह कर" त्याने रागानेच तिला म्हटलं.
"मी जरा कामात आहे. कोणाचा आहे तो तुम्ही पहा." ती शांतपणे म्हणाली.
 
शेवटी मोबाईल घेण्यासाठी त्याने पर्स हातात घेतली तर तो मोबाईल नेमका कोणत्या कप्प्यात आहे, हे काही त्याला समजेना.
 
मध्येच त्याच्या हाताला गोळ्यांचे पॅकेट लागलेे, तर मधूनच पिना, आरसा, रुमाल, पावडर, बॉटल, फुले, पेन, चाव्या, ह्या  वस्तू लागल्या. दुसऱ्या कप्प्यात हात घालेपर्यंत एक पुस्तक अन डायरी हाताला लागली. पर्सच्या छोट्याशा कप्प्यात चॉकलेटस् ठेवली होती.
 
खरं म्हणजे त्याने मोबाईल शोधायला पर्समध्ये हात घातला होता. पण त्याला त्याचवेळी अनेकगोष्टी हाती आल्या.
 
त्याचा हात कळतनकळत स्वतःच्या खिशाकडे गेला तर त्याच्या खिशात नोटांशिवाय काहीच नव्हते. तो विचार करू लागला,
खरंच पर्समधील मोबाईलप्रमाणे तिच्या मनाचाही कधीच थांगपत्ता लागत नाही. नेमके तिला काय हवे आहे याचाही ती पत्ता लागू देत नाही. सर्वांची काळजी घेणे एवढेच तिला ठाऊक असते.
 
पर्समधील डायरीत सर्व गोष्टींच्या नोंदी तिने ठेवलेल्या असतात, तर मुलांना खुश ठेवण्यासाठी  छोट्याशा कप्प्यात ती चॉकलेटही ठेवते. कधी बरे वाटत नाही असे म्हणेपर्यंत हातात तिने चटकन गोळी ठेवलेली असते. आणि त्याचबरोबर स्वतःचीही ती तशीच काळजी घेते. तिच्या पर्समध्ये कायमच रुमाल,आरसा आणि पावडर ही असतेच. सर्व टेन्शनपासून स्वतःला खुश ठेवण्यासाठी तिने स्वतःस पुस्तकवाचना सारखे छंदही जोपासले आहेत.
 
आणि आपण काय करतो, तर सतत खूप काम आहे ह्या  सबबीखाली आळशी बनत असतो. प्रत्येक कामाची तिच्याकडून अपेक्षा करून स्वतःस अपंग बनवीत असतो.
 
आज तिची पर्स त्याला बरेच काही सांगत होती. ही पर्सच तिच्यासाठी बऱ्याच वेळा आधार असते.
 
ज्यावेळेस ती एकटीच कुठेही जाते त्यावेळेस मात्र पर्सला तिने घट्ट धरून ठेवलेले असते. साडी, ड्रेस अथवा इतर कोणताही पेहराव तिने घातलेला असो, पण तिच्या सोबतीला पर्स ही कायम असतेच.
 
तिच्या पर्सचे विविध कप्पे तिच्या मनाची उकल करत असतात.
बऱ्याच वेळा तिने अडकवलेली लॉंगपर्स ती बिनधास्त, तेवढीच धीट आहे असंच सांगत असते, तर तिच्या बघलेतील मोठी पर्स, त्या मधील सामान अनेक जबाबदाऱ्यांचे सहज स्पष्टीकरण देत असते.
 
जर एखाद्या स्त्रीच्या स्वभावाचा अथवा मनाचा तळ शोधायचा असेल तर प्रत्येक पुरुषाने तिची पर्स नक्कीच एकदा तरी पहावीच.........!!!

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

कैलाश खेरच्या लाईव्ह शोमध्ये गोंधळ, गर्दी उफाळून आली, गाणे थांबवले

धुरंधर'चा 20 व्या दिवशी 600 कोटी क्लबमध्ये प्रवेश

हिवाळ्यातील रात्रीच्या आकाशाचे सौंदर्य पाहण्यासाठी दक्षिण भारतातील या शांत ठिकाणी नक्कीच भेट द्या

Flashback २०२५ मध्ये या बॉलीवूड अभिनेत्रींनी रेड कार्पेट फॅशनला नव्या अंदाजात सादर केले

बिगबॉस फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात

पुढील लेख
Show comments