Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 12 April 2025
webdunia

संथ निळे हे पाणी

Sea
, बुधवार, 28 ऑगस्ट 2024 (11:30 IST)
संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
कुरळ्या लहंरीमधुनी
शिळ घालतो वारा
 
दुर कमान पुलाची
एकलीच अंधारी
थरथरत्या पाण्याला
कसले गुपीत विचारी
 
भरुन काजव्याने हा
चमके पिंपळ सारा
स्तिमीत होऊनी तेथे
अवचित थबके वारा
किरकीर रात किड्यांची
निरवतेस किनारी
ओढ लागुनी छाया
थरथरते अंधारी
मध्येच क्षितीजावरुनी
विज लकाकुन जाई
अन ध्यानस्थ गिरी ही
उघडुनी लोचन पाही
हळुच चांदने ओले
थिबके पाणावरुनी
कसला क्षन सोनेरी
उमले प्राणामधुनी
 
संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
दरवळला गंधाने
मओनाचा गाभारा
 
कवी- मंगेश पाडगांवकर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

झोपेच्या या स्थितीमुळे ॲसिडिटीपासून पाठदुखीपर्यंतच्या समस्या वाढतात, जाणून घ्या त्याचे 6 तोटे