Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गजराज आणि मूषकराज

Webdunia
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (14:19 IST)
प्राचीन काळी एका नदीच्या काठी वसलेले नगर व्यवसायाचे केंद्र होते. एके वर्षी जोराचा पाऊस झाला की त्या मुळे नदीने आपले मार्ग दुसरीकडे वळवले. त्या मुळे  संपूर्ण नगरात पाण्याची कमतरता झाली. बघता-बघता संपूर्ण नगर ओसाड झालं. आता त्या नगरात मानवी वस्ती नसून उंदराचे साम्राज्य झाले होते. त्या साम्राज्याचा राजा मूषकराज बनला. 
 
उंदरांचे नशीब म्हणजे की त्यांनी वस्ती केल्यावर त्या नगराच्या बाहेर पाण्याच्या स्रोतांना पाझर फुटला आणि तिथे एक मोठा जलाशय बनला. त्या नगराच्या थोड्याच अंतरावर एक घनदाट अरण्य होतं. त्या अरण्यात असंख्य हत्ती राहत होते. गजराज हा त्यांचा राजा होता. तो प्रचंड मोठा होता. एकदा त्या अरण्यात पाण्याची कमतरता झाली. सर्वत्र वाळवंट झाले होते. प्राणी पाण्याच्या शोधात भरकटत होते. जड शरीर असलेल्या हत्तींची फार दुर्दशा होत असे.

हत्ती आणि त्यांची मुलं पाण्याअभावी किंचाळून मरत होते. गजराज हे सर्व बघून काळजीत पडला आणि काय करावं ह्याचा विचार करू लागला. 
 
एके दिवशी त्याच्या मित्र गरूडाने त्याला येऊन सांगितले की या नगराच्या दुसऱ्या बाजूस एक तलाव आहे आणि आपण तेथे जाणून आपली तहान भागवू शकता. हे ऐकताच गजराजने सर्वाना तिथे जाण्याचा सल्ला दिला. सगळे हत्ती त्या तलावाकडे जाऊ लागले. त्यांना ज्या वाटेतून जावं लागतं होत त्या वाटेत उंदराचे बीळ होते. दररोज ते हत्ती पाणी पिण्यासाठी तिथे यायचे आणि परत त्याच वाटेनी परतायचे. त्यांच्या नकळत त्यांच्या पायदळी हजारो उंदीर चिरडले गेले. असे बघून मूषकराजला काळजी वाटली. त्या उंदराच्या गटांमधून एका उंदराने त्याला सुचवले की आपण जाऊन गजराजशी बोला ते फार चांगले आहेत आपले म्हणणे ऐकतील. 

मूषकराज गजराजला जाऊन भेटतात आणि सर्व घडलेले सांगतात. सर्व ऐकून गजराजला फार वाईट वाटतं आणि तो नकळत केलेल्या कृत्याबद्दल त्याची माफी मागतो. मूषकराजला गजराज सांगतो की आम्ही आता तिथे येण्यासाठी वेगळा मार्ग शोधू. जेणे करून आमच्या मुळे तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. या वर मूषकराज त्याचे आभार मानतो आणि आपण माझ्या सारख्या लहान प्राण्याचे म्हणणे ऐकून घेतले मी आपल्या कधीकाळी कामी येईन असे म्हणतो. गजराज विचार करतो की हा इवलुसा प्राणी माझ्या कसा कामी येईल. यावर गजराज स्मितहास्य करून मूषकराजाला निरोप देतो. 
 
काही दिवसा नंतर शेजारच्या राज्याच्या राजा आपल्या सैन्यात हत्ती समाविष्ट करण्याचा विचार करून अरण्यातून हत्ती पकडून आणण्याचे आदेश देतो. राजाजे सैनिक असंख्य हत्ती पकडतात. गजराज काळजीत पडून विचार करत करत फिरत असताना त्याचा पाय सैनिकांनी टाकलेल्या जाळयात पडतो आणि तो जाळ्यात अडकतो. जेवढे तो स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करायचा अजूनच तो त्या जाळ्यात गुरफटच जायचा. गजराज स्वतःला वाचविण्यासाठी मोठ्या-मोठ्याने ओरडतो. 
 
त्याचे ओरडणे ऐकून रानटी नर म्हैस जवळ येऊन त्याला काय मदत करू असे विचारतो. कारण त्या म्हैसला लहानपणी गजराजने वाचवले असते. त्यामुळे तो त्या गजराजाचे आदर करत असे. त्याला गजराज सांगतात की तू त्या नगराच्या जवळ उंदराचे बीळ आहेत तिथे जा आणि मूषकराजाला घेऊन ये. 
 
म्हैस द्रुतगतीने जातो आणि मूषकराजाला घडलेले सांगतो. मूषकराज आपल्या सह आपल्या सैन्याला घेऊन म्हशीच्या पाठी वर बसतो आणि गजराज कडे येऊन बघतो तर गजराजची स्थिती फार केविलवाणी झालेली असते. त्याला गजराजला बघून वाईट वाटत आणि तो आपण काळजी करू नका, मी आपल्याला यातून सोडवतो असे म्हणत आपल्या सैन्यासह जाळ कापण्यास सुरू करतो आणि गजराजला त्या जाळेतून सोडवतो. अशा प्रकारे उंदराने गजराजला दिलेले वचन पाळले आणि गजराज ची सुटका करून त्याचे प्राण वाचवले. गजराजला देखील इवल्याश्या जीवाची महत्ता कळते. ते दोघे आनंदात राहू लागतात.
 
 
बोध: परस्पर सामंजस्याने आणि प्रेमाने राहून एकमेकांचे त्रास दूर करून समस्यांवर मात देता येते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

नवज्योत सिंग सिद्धूच्या पत्नीने कॅन्सरवर केली मात? आयुर्वेदाच्या मदतीने स्टेज 4 चा पराभव

आवळ्याची चटणी रेसिपी

फुफ्फुसांना बळकट करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा

नैसर्गिक लुकसाठी लिपस्टिकऐवजी या गोष्टी वापरून पहा

पुढील लेख
Show comments