rashifal-2026

बालकथा : मोठेपणा

Webdunia
एकेदिवशी काही कामकरी दगडाच्या खाणीत काम करीत असता त्यांनी खडकाचा अर्धा भाग फोडला. इतक्यात त्या खडकाच्या पोटातून चटकन एक मोठा बेडूक उडी मारून बाहेर आला. हे पाहून मजुरांना फार आश्चर्य वाटले व ते त्याकडे कौतुकाने पाहात उभे राहिले. तो बेडूक त्या खडकाच्या पोटात जन्मला कसा, जगला कसा व वाढला कसा, यासंबंधी ते कामकरी आपसात बोलू लागले. त्यांची भाषणे कानी पडताच त्या बेडकालाही स्वत:बद्दल मोठी धन्यता व गर्व वाटू लागला. तो म्हणाला, दादांनो, मागचा प्रलय होऊन गेल्यावर जेव्हा भगवंताने पिंपळाच्या पानावर जन्म घेतला, तेव्हाच मीही जन्माला आलो. माझ्या बरोबरीचा म्हणवू शकेल असा एकही प्राणी या जगात नाही.  

भगवंताचे आणि माझे कूळ एकच आणि मीही पुढच्या प्रलयापर्यंत जगणार! तो बोलत आहे. इतक्यात एक मधमाशी तेथे येऊन म्हणाली, बेडूकदादा, तू पुष्कळ काळ जगलास आणि तुझा जन्म मोठय़ा कुळात झाला तरी तुला यात गर्व वाटण्यासारखे काय आहे?  

आपल्या लांबलचक आयुष्याने कोणाचा काय फायदा होणार आहे. तीच माझी गोष्ट पाहा बरे? माझे आयुष्य मोठे नाही. तथापि मी सदोदित उद्योग करते व लोकांच्या उपयोगी पडते. नाना प्रकारच्या सुंदर फुलझाडांचा मला उपभोग मिळतो व सर्वानी कित्ता घेण्याजोगे माझे वर्तन असते. मोठय़ा कुळात जन्मून हजारो वर्षे जगले, परंतु सारे आयुष्य आळसात व अज्ञानात घालविले तर त्याचा काय उपयोग?

तात्पर्य : खरा मोठेपणा अंगच्या गुणावर व कर्तृत्वावर अवलंबून असतो. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

भारतीय समाजात घटस्फोटाचे प्रमाण का वाढते आहे? नाते वाचवण्यासाठी काही सोपे प्रयत्न

Lohri 2026 Special Dishes लोहरी विशेष बनवले जाणारे खास पदार्थ

Lohri Wishes in Marathi 2026 लोहरीच्या शुभेच्छा मराठीत

Sankranti Bhogi 2026 अस्सल मराठमोळी भोगीची संपूर्ण थाळी

वजन कमी करण्यासाठी अंजीरचे फायदे, दररोज किती खावे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments