Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गणपतीसारख्या भव्य देवतेला उंदरासारखे एवढेसे छोटे वाहन कसे

Webdunia
गणपतीची कोणतीही मूर्ती पाहिली तरी गणपतीबाप्पांच्या पायाशी वाहन म्हणून असलेला मूषक किंवा उंदीर दिसतोच. उंदीर हेच गणपतीचे वाहन म्हणून आपण मानतो. याबद्दल एक कहाणी या प्रकारे आहे:
 
एकदा इंद्रसभेत गंभीर विषयावर चर्चा सुरू होती परंतू क्रौंच नावाच्या गंधर्वाचे मन अजून कुठेतरी रंगलेले होते. क्रौंच तेथे उपस्थित असलेल्या अप्सरांसोबत थट्टा करत होते. हे बघून इंद्र नाराज झाले आणि त्यांनी गंधर्वाला शाप दिला, की आता तू उंदीर होशील. शापाने क्रौंचाचे बलवान उंदरात परिवर्तन झाले. तो उंदीर पराशर ऋषींच्या आश्रमाजवळ पडला.
 
या उंदराने पराशर ऋषींच्या आश्रमात खूप धुमाकूळ घातला. आश्रमातल्या अन्नधान्याची नासाडी करण्यास सुरुवात केली. आश्रमातील ग्रंथ-पोथ्या, कपडेसुद्धा त्याने कुरतुडून टाकले. त्याने आश्रमवासी आणि पराशरऋषींना भंडावून सोडले. शेवटी पराशरऋषींनी श्रीगजाननाची प्रार्थना केली, ‘ हे गजानन! आम्हाला या उंदराच्या त्रासापासून सोडव.’
 
मग गणपतीने तेथे प्रकट होऊन आपला पाश उंदरावर टाकला. पाताळात उंदीराचा पिच्छा करत पाशने त्याचा कंठ बांधला गेला आणि गणपतीसमोर प्रस्तुत झाला. तेव्हा तो उंदीर आपली सुटका करावी म्हणून गणपतीकडे गयावया करु लागला. उंदीर शरण आला म्हणून गणपतीने त्याला वर मागण्यास सांगितले. पण उंदराचा उन्मत्त्पणा अजूनही गेला नव्हता. त्याने गर्विष्ठपणे गणपतीलाच म्हटले, ‘मला तुझ्याकडून कोणताही वर नको हवं असल्यास तूच माझ्याकडे वर माग.’ त्याचा हा उद्धामपणा पाहून गणपती हास्यस्मित करत लगेच म्हणाले, ‘जर तूझं वचन सत्य आहे तर आजपासून तू माझे वाहन हो.’ मूषकने तथास्तु म्हटले आणि गणपती लगेच उंदराच्या पाठीवर आसनस्थ झाले. मग मात्र गणपतीच्या भाराने तो उंदराच्या प्राणावर संकट ओढावले तेव्हा उंदराने प्रार्थना केली की मला तुझा भार सहन करणे योग्य करं. आणि त्या दिवसापासून उंदीर गणपतीचे वाहन झाला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

सर्वांना आवडेल अशी झटपट मुगाच्या डाळीची चकली

Conceive Quickly गर्भधारणा करायची असेल तर संबंध ठेवल्यानंतर किती पडून राहणे आवश्यक जाणून घ्या

Winter Special Recipe: गाजर हलवा

व्यावसायिक पायलट होण्यासाठी प्रक्रिया जाणून घ्या

या फळात आहे पुरुषांच्या 5 समस्यांवर उपाय, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments