Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

1666 मध्ये फळांच्या टोपलीत लपून शिवाजी औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर आले होते

Webdunia
शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (10:52 IST)
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला होता. ते महानायक होते. छत्रपती शिवाजींच्या वाढत्या सामर्थ्याने चिंतित मुघल बादशाह औरंगजेबने दक्षिणेत नियुक्त केलेल्या आपल्या सुभेदाराला त्याच्यांवर हल्ला करण्याचा आदेश दिला.पण सुभेदारला तोंडाची खावी लागली. छत्रपती शिवाजींबरोबरच्या लढ्यात त्याने आपला मुलगा गमावला आणि स्वतःच त्याची बोटं कापली गेली. त्याला मैदान सोडून पळून जावे लागले.या घटनेनंतर औरंगजेबाने आपल्या सर्वात प्रभावशाली सेनापती मिर्झा राजा जयसिंग यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 100,000 सैनिकांची फौज पाठवली.
 
श्रीमंत छत्रपती शिवाजींना चिरडून टाकण्यासाठी राजा जयसिंगने बीजापुरच्या सुल्तानशी संधी गाठत पुरंद‍र किल्ला
आपल्या ताब्यात घेण्याच्या प्रथम योजनते 24 एप्रिल 1665 रोजी 'व्रजगढ' किल्ला ताब्यात घेतला. पुरंदर किल्ल्याचे रक्षण करताना श्रीमंत छत्रपती शिवाजींचा अत्यंत शूर सेनापती 'मुरारजी बाजी' मारला गेला.पुरंदरचा किल्ला वाचवण्यासाठी महाराजांनी महाराजा जयसिंगसोबत एक करार केला. दोन्ही नेत्यांनी कराराच्या अटींवर सहमती दर्शविली आणि 22 जून 1665 रोजी 'पुरंदरचा करार' संपन्न झाला.
 
सुरक्षेचे पूर्ण आश्वासन मिळाल्याने छत्रपती शिवाजी आग्र्याच्या दरबारात औरंगजेबाला भेटण्यास तयार झाले. ते 9 मे 1666 रोजी आपला मुलगा छत्रपती संभाजी आणि 4000 मराठा सैनिकांसह मुघल दरबारात हजर झाले, परंतु औरंगजेबाकडून योग्य आदर न मिळाल्याने छत्रपती शिवाजींनी औरंगजेबाला भरलेल्या दरबारात 'विश्वासघातकी' म्हटले, परिणामी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी आणि त्यांच्या  मुलाला 'जयपूर भवनात' कैद केलं. तिथून छत्रपती शिवाजी 13 ऑगस्ट, 1666 रोजी फळांच्या टोपलीत लपून पळून गेले आणि 22 सप्टेंबर 1666 रोजी रायगडावर पोहोचले होते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात सूर्यप्रकाश घेण्याची योग्य पद्धत कोणती आहे, जाणून घ्या

केसगळतीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी या एका गोष्टीने केस गळती वर उपचार करा

हिवाळ्यात शरीरात पाण्याच्या कमतरते मुळे होऊ शकतो हृदयविकाराचा धोका

या 5 चुका वैवाहिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त करतात

आरोग्यवर्धक खजूर आणि तिळाची चिक्की

पुढील लेख
Show comments