Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बोधकथा : बाह्य रूपावर फसू नये

Webdunia
शुक्रवार, 26 जून 2020 (18:37 IST)
एका रानातल्या खडकावर दोन घोरपडी उन्हं खात बसल्या असता, तपैकी एकजण दुसरीस म्हणाली, 'आमची स्थिती मोठी शोचनीय आहे! आम्ही फक्त जिवंत आहोत एवढेच, बाकी सगळ्या जगात आमच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. आमच्या क्षुद्रतेचा धिक्कार असो! यापेक्षा रानातल्या वार्‍यासारख्या उड्या मारणार्‍या हरणाचा जन्म  मिळाला असता तर काय मजा आली असती!' हे बोलत असतानाच एका हरिणामागे लागलेल्या शिकारी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला व धावून थकलेल्या  हरणाचा जीव कुत्र्याने घेतलेला तिने पाहिला. त्यावेळी दुसरी घोरपड आपल्या स्थितीविषयी कुरकुरणार्‍या घोरपडीस म्हणाली, 
'ज्या हरणाचे जीवनआपल्याला मिळावे अशी इच्छा तू करीत होतीस त्या हरणाची स्थिती किती भयंकर आहे, हे आता प्रत्यक्षच पाहा अन् ज्या मोठेपणाबरोबर अनेक दुःखेही भोगावी लागतात, तो मोठेपणा देवाने आपणास दिला नाही याबद्दल त्याचे आभार मान!'
 
तात्पर्य - बाह्य रूपावर जाऊन फसू नये. कारण त्यांच्या अंतर्यामी दुःख असण्याचीच शक्यता असते. 

संबंधित माहिती

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments