Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंचतंत्र कहाणी : एक तहानलेला कावळा

Webdunia
बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 (20:30 IST)
अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका घनदाट जंगलात एक कावळा राहायचा. तसे तर जंगल खूप सुंदर आणि हिरवेगार होते. सर्व पशुपक्षी तिथे आनंदात राहत होते. तसेच हा कावळा देखील खूप आनंदात राहत होता. 
 
पण एकदा काय झाले एका वर्षी पाऊसच पडला नाही त्यामुळे त्या जंगलात कोरडा दुष्काळ पडला व झाडे, तलाव , सरोवर सर्व अगदीच वळून गेले. सर्व पशु पक्षी जंगल सोडून जाऊ लागले. तसेच कावळा देखील जंगल सोडून जायला लागला. तर वाटेत कावळ्याला तहान लागली. तो इकडे तिकडे पाहू लागला कुठे पाणी मिळते आहे का असे. उडत उडत तो एका गावाजवळ येऊन पोहचला. त्याला तिथे एक रांजण दिसला त्याला खूप आनंद झाला तो जाऊन त्या पाण्याच्या रांजण वर बसला. त्याने आत वाकून पाहिले तर त्याला आतमध्ये अगदीच तळाशी पाणी दिसले. आता काय करावे कावळ्याला सुचेना, तसेच तहानलेला बिचारा कावळा विचार करू लागला. कावळ्याला एक युक्ती सुचली रांजण जवळ पडलेले खडे त्याने चोचीमध्ये धरून पाण्यात टाकायला सुरवात असे करता करता पाणी वर आले व खडे खाली तळाशी गेले. कावळ्याला मोठा आनंद झाला. तहानलेल्या कावळ्याने पोटभर पाणी पिले. व तिथून उडून गेला. 
 
तात्पर्य : शांत बुद्धीने अनेक कठीण समस्यांवर मार्ग निघतात. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रावणाच्या मृत्यूचे हे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात?

प्रत्येक समस्यांचे निराकरण : नवरात्रीत विड्याच्या पानांनी करा हे 5 चमत्कारी उपाय

Fatty Liver Natural Treatment या 5 आयुर्वेदिक औषधी फॅटी लिव्हरसाठी रामबाण उपाय

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज काय योग्य आहे? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर त्यावर मधाने उपचार करा

जास्त पिकलेली केळी खाणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे का?

जोडीदाराच्या मानसिक आरोग्याचा संबंधांवर परिणाम होऊ शकतो अशा प्रकारे हाताळा

पंचतंत्र कहाणी : एक तहानलेला कावळा

चहा पावडर मध्ये भेसळ आहे का नाही?ओळखण्यासाठी या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments