अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक घनदाट जंगलात एक तलाव होता. ज्या तलावामध्ये अनेक बेडूक राहायचे. त्यामध्ये एक बेडूक आपल्या तीन पिल्लांसह राहायची. एकदा बेडकाची तब्येत स्थूल झाली. व तलावातील सर्वात मोठा बेडूक बनला होता. त्या बेडकाचे पिल्ले त्याला पाहून खूप खुश व्हायचे. त्या पिल्लांना वाटायचे की त्यांचे वडील जगातील सर्वात शक्तिशाली बेडूक आहे. तसेच बेडकाला देखील त्याच्या शरीरावर मोठा गर्व होता.
एकदा बेडकाचे पिल्ले खेळता खेळता तलावाच्या बाहेर निघाले. व शेजारील गावात पोहचले. व तिथे त्यांनी एका बैलाला पाहिले. त्यांनी आज पर्यंत एवढा मोठा प्राणी कधीही पहिला न्हवता. तसेच ते पळत पळत तलावात आले व आपल्याला वडिलांना सांगितले की आम्ही खूप मोठा प्राणी पाहिला. तो प्राणी तुमच्या पेक्षा देखील मोठा होता. आता हे ऐकून बेडकाला राग आला.
तसेच बेडकाने मोठा श्वास घेतला आणि स्वतःचे अंग फुलवले. व पिल्लांना विचारले की याच्या पेक्षा देखील मोठा होता का? पिल्ले म्हणाले की, हो याच्या पेक्षा देखील मोठा होता.
बेडकाला राग आला व त्याने आणखीन अंग फुलवले व म्हणाला की यापेक्षा देखील मोठा होता का? तसेच बेडकाचे पिल्ले म्हणाले हो या पेक्षा देखील मोठा होता. असे करता करता बेडकाने आपलॆ पोट फुलवले. बेडकाचे पोट फुग्याप्रमाणे फुलले. तसेच परत तो पिल्लाना म्हणाला यापेक्षाही मोठा होता का? पिल्ले म्हणाले हो यापेक्षाही मोठा होता. मग बेडकाने अतिशय मोठे पोट फुलवले. आणि असे करतांना शेवटी त्याचे पोट फुटले. व बेडकांचा मृत्यू झाला. बेडकाने अहंकारामुळे आपला जीव गमावला.
तात्पर्य-कधीही अहंकार करू नये; अहंकाराने स्वतःचेच नुकसान होते.