Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टोपीवाला आणि माकड The Cap Seller And The Monkeys Story

Webdunia
शनिवार, 18 डिसेंबर 2021 (12:17 IST)
एकेकाळी एक टोपीवाला अथार्त टोपी विकणारा होता. तो आनंदित स्वराने जोरजोराने म्हणायचा, “टोप्या घ्या, टोप्या… रंगीबेरंगी टोप्या, पाच, दहा, प्रत्येक वयाच्या टोप्या…” तो टोप्या विकत गावोगावी जायचा.
 
एकदा, जंगलातून जात असताना, थकल्यासारखे वाटत होतं म्हणून तो एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसला. काही वेळातच त्याचा डोळा लागला. त्या झाडावर बरीच माकडे होती.
 
टोपीवाल्याला झोपलेले पाहून माकड खाली आला, त्याचे बंडल उघडले, टोप्या घेतल्या आणि पुन्हा झाडावर जाऊन बसला. टोप्या घालून सर्वजण आनंदाने टाळ्या वाजवू लागले.

टाळ्यांचा आवाज ऐकून टोपीवाल्याची झोप उघडली. त्याने त्याचे बंडल उघडले आणि टोप्या गायब असल्याचे आढळले. आजूबाजूला पाहिले पण टोप्या दिसल्या नाहीत.
 
अचानक त्याची नजर झाडावर टोपी घातलेल्या माकडांवर पडली. टोपीवाला विचार करु लागला की आता यांच्याकडून टोप्या परत मिळणार तरी कश्या? थोड्या वेळाने त्याला काहीतरी सुचलं. त्याने आपली टोपी काढून खाली फेकली.
 
नक्कल करणार्‍यासाठी ओळखले जाणारे माकड.. त्यांनी नक्कल करत आपल्या डोक्यावरील टोप्या काढून खाली फेकल्या. टोपीवाल्यांनी त्यांना एकत्र केले आणि आनंदाने एक बंडल बनवला आणि बाजा घेऊन निघून गेला…, “घे टोपी भाऊ, टोपी… रंगीबेरंगी टोपी…

संबंधित माहिती

सोशल मीडिया बनला जीवघेणा शत्रू , ट्रोलिंगने घेतला आईचा जीव

भगवान जगन्नाथांशी जोडलेल्या टीकेवर संबित पात्राने मागितली माफी, म्हणाले-प्रायश्चित्तासाठी ठेवेल 3 दिवस उपास

नोएडा मध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कारने दिली धडक, एका विद्यार्थ्यांचा मृत्यू

भाजप आमदाराच्या नातवाची आत्महत्या

वडील आणि मुलाची वेगवेगळी 'सेना', गजानन कीर्तिकरांच्या पत्नीने कोणाला दिले मत?

5 प्रकारचे चहा आरोग्यासाठी फायदेशीर

पुरळ आले आहेत का? कडुलिंबाचे 2 फेसपॅक करतील मदत, त्वचा होईल चमकदार

पायांना सूज येत असल्यास, अवलंबवा हे घरगुती ऊपाय

केसांना एलोवेरा जेल लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

सतत कंबर दुखत असेल तर करा हे योगासन

पुढील लेख
Show comments