वातावरण कोणतेही असो भाजी किंवा डाळ, तांदूळ यांना काही वेळेनंतर किडे लागायला लागतात. अशामध्ये काही सोप्या टिप्स आत्मसात केल्यास तुमच्या वस्तू खराब होणार नाही.
पावसाळ्यात नेहमी भाज्या आणि धान्य खराब होते. या वातावरणात नेहमी भाज्या खराब होता, धन्य खराब होते. म्हणून आज आम्ही तुम्हाला अश्याच काही सोपे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही भाज्या आणि धान्य सुरक्षित ठेऊ शकाल.
तांदळात किडे पडू नये म्हणून उपाय-
पावसाळ्यात तांदळात किडे पडू नये म्हणून तांदूळ एयर टाईट कंटेनरमध्ये ठेवावे. आता एका टिशूमध्ये आले, लसूण आणि वेलची ठेऊन तांदळाच्या मध्यभागी ठेवावे. यामुळे तांदळात किडे पडणार नाही.
केळे खराब होऊ नये म्हणून उपाय-
केळे दोन ते तीन दिवसांमध्ये सडून जातात. अश्यावेळेस केळे सडू नये म्हणून केळे पहिले पाण्याने धुवून घ्यावे मग एका टिशू ने स्वच्छ करून घ्यावे. यानंतर एक टिशू ओला करून केळाचे देठ त्यामध्ये गुंडाळावे. यामुळे दोन आठवडे केले खराब होणार नाही.
टोमॅटो खराब होऊ नये म्हणून उपाय-
पावसाळ्यात टोमॅटो लवकर खराब होतात. याकरिता तुम्ही टोमॅटोच्या देठाकडे टेप लावून ठेवा. यामुळे टोमॅटो मॉइश्चर होणार नाही व खूप दिवस टिकेल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.