suvichar

भाजी बनवताना लक्षात ठेवा या 10 किचन टिप्स

Webdunia
गुरूवार, 21 जानेवारी 2021 (09:09 IST)
*कोबी शिजवताना शुभ्र रंग कायम राखण्यासाठी त्यात जरासे व्हिनेगर घालावे.
*पालेभाज्या सुकत असल्यास पाण्यात १ चमचा व्हिनेगर किंवा लिंबाचं रस घालून त्यात ठेवल्या तर ताज्या होतात.
*भरीतासाठी वांगी भाजण्यापूर्वी त्याला पुसट तेलाचा हात लावावा किंवा सुरीने छोटी चिर पाडावी. नंतर वांगी भाजून लगेच पातेल्याखाली झाकून ठेवल्यास साल नीट सुटतात.
*पालक कच्चा मिक्सरमध्ये वाटून मग भाजी बनवल्यास हिरवा रंग कायम राहतो.
*हिरवी मिरची जास्त काळ टिकावी यासाठी मिरचीचे देठ काढून ठेवावी.
*कांदे आणि बटाटे एकत्र साठवू नये. अशाने बटाटे जास्त काळ चांगले राहत नाही.
*रस्सा भाजीत मीठ जास्त पडल्यावर त्यात उकडलेला बटाटा घालावा किंवा कणकेचा गोळा देखील घालू शकता.
*बटाटे झटपट उकळण्याकरिता पाण्यात चिमूटभर हळद घालावी.
*भाज्यांमध्ये मीठ शेवटी घालावे. अशाने भाज्यांमधील लोह टिकण्यास मदत होते.
*भेंडीची भाजी शिजवताना त्यात आंबट घातल्याने ती चिकट होत नाही. आपण दही किंवा आमचूर पावडर घालू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

होळी खेळण्यापूर्वी चेहऱ्यावर आणि त्वचेवर तूप आणि खोबरेल तेल लावण्याचे फायदे

शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्याच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Parenting Tips:मुले त्यांच्या पालकांपासून दूर जाण्याचे मुख्य कारण जाणून घ्या

प्रेरणादायी कथा: उंट आणि झेब्राची गोष्ट

घरीच फक्त अर्ध्या तासात मऊ पनीर बनवण्याची स्टेप बाय स्टेप सोपी पद्धत जाणून घ्या

पुढील लेख
Show comments