अनेक वेळेस काचेच्या ग्लास वरील डाग काढणे कठीण जाते. तसेच या डागांमुळे काचेच्या ग्लासची सुंदरता कमी होते. काचेच्या ग्लासवरील डाग काढण्यासाठी हे घरगुती उपाय करून पहा. या टीप नैसर्गिक साहित्यांचा उपयोग करून ग्लास चमकदार आणि स्वच्छ करतील. तर चला जाणून घेऊन घरगुती टिप्स कोणत्या आहे.
लिंबू आणि मिठाचा उपयोग-
एक लिंबू चिरून त्यावर थोडे मीठ घालावे. आता हा लिंबू ग्लासवर डाग असलेल्या ठिकाणी रगडावा. लिंबाचा रस आणि मीठ लागलीच डाग स्वच्छ करतील. यानंतर ग्लास कोमट पाण्याने धुवून घ्यावा.
व्हिनेगर आणि बेकिंग सोडा-
एका वाटीमध्ये व्हिनेगर घ्यावे. आता त्यामध्ये बेकिंग सोडा मिक्स करावा. या मिश्रणला ग्लास वर लावून हलक्या हाताने घासावे. व काही मिनिटांनी ग्लास धुवून घ्यावा.
वृत्तपत्र आणि व्हिनेगर-
ग्लास वर व्हिनेगर शिंपडून एका वृत्तपत्राने पुसून घ्यावे. वृत्तपत्राची शाई आणि व्हिनेगर मिळून ग्लास वरील डाग कमी करतात व ग्लास चमकायला लागतात.
बटाट्याचा उपयोग-
एक बटाटा मधुन कापून घ्यावा. व त्याला ग्लास वर असलेल्या डागांवर रगडावे. बटाट्यात असलेले स्टार्च डाग कमी करण्यास मदत करतात व नंतर ग्लास पाण्याने धुवून घ्या.
टूथपेस्ट-
थोडीशी टूथपेस्ट घ्या आणि तिला ग्लास वरील डागांवर लावा. टूथपेस्टला हलक्या हातांनी रगडा व नंतर ग्लास धुवून घ्या. ही विधी ग्लासला स्वच्छ आणि चमकदार बनवते.
आल्याची पेस्ट-
आले बारीक करून त्याची पेस्ट तयार करा. व ही पेस्ट ग्लासवर लावा. आल्यामधील नैसर्गिक एंजाइम डाग काढून टाकण्यास मदत करतात. काही वेळानंतर ग्लास धुवून टाकावा.
सोडा वॉटर-
सोडा वॉटर ग्लासवर शिंपडावे आणि एका मऊ कपड्याने पुसून घ्यावे. सोडा वॉटर डाग काढण्यासाठी मदत करतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.