Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किचन हॅक: गजक दीर्घकाळ साठवण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Webdunia
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (15:57 IST)
हिवाळ्यात, लोक उन्हात बसून शेंगदाणे आणि गजकाचा आनंद घेतात. थंडीच्या हंगामात गजक खाण्याची मजाच वेगळी असते. या हंगामात  अनेकवेळा लोक गजक अगोदरच विकत घेतात आणि ते जास्त प्रमाणात साठवून ठेवतात जेणेकरून त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा त्याची चव चाखता येईल. पण हे  माहीत आहे का की गजक योग्य प्रकारे साठवले नाही तर त्याची चव खराब होण्यासोबतच ती शिळू  लागते. अशा परिस्थितीत, आपण स्वयंपाकघराशी संबंधित काही सोप्या हॅकस जाणून घेऊया ज्यामुळे गजकाची चव टिकून राहण्यास तसेच दीर्घकाळ साठवून ठेवण्यास मदत होईल. 
 
गजक जास्त काळ साठवण्यासाठी टिप्स
1 थंड ठिकाणी किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा -
गजकाचा ताजेपणा आणि चव दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी नेहमी थंड ठिकाणी किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. गजक गरम ठिकाणी ठेवल्यास ते लवकर खराब होतात. गजक काचेच्या बरणीत साठवा. 
 
2 हवाबंद डबा -
 हवेच्या संपर्कात आल्यामुळे कोरडे गजक लवकर शिळू लागतात. त्यामुळे ते कुरकुरीतही राहत नाही आणि इतर कीटकही त्यात शिरू लागतात. अशा परिस्थितीत गजकांना नेहमी हवाबंद डब्यात ठेवा.  
 
3 ओलसर जागेपासून दूर राहा- गजकाला ओल्या जागी ठेवल्याने त्याची चव खराब होते. हिवाळ्याच्या काळात हवेतील ओलावा कायम राहतो. अशा परिस्थितीत गजकाची चव दीर्घकाळ चांगली ठेवण्यासाठी त्याला पाणी, सूर्यप्रकाश आणि आर्द्रता यापासून दूर ठेवा. 
 
4 काचेच्या बरणीत गजक ठेवा -
गजक महिनाभर साठवायचा असेल तर काचेच्या बरणीत भरून थंड ठिकाणी ठेवा. गजक खावेसे वाटत असेल तर ते काढून टाकल्यावर लगेचच डब्याचे झाकण चांगले बंद करावे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments