Festival Posters

कारल्यातील कडूपणा अश्या प्रक्रारे काढून टाका

Webdunia
शनिवार, 5 एप्रिल 2025 (16:00 IST)
Kitchen Tips : कारले ही एक आरोग्यदायी भाजी आहे. मधुमेहात डॉक्टर कारले खाण्याचा सल्ला देतात. पण कारल्याच्या कडूपणामुळे अनेकांना ते खायला आवडत नाही. विशेषतः मुले कारले खाणे टाळतात. कारल्याची भाजी कडू असते अशी तक्रार अनेक लोक करतात. आज आम्ही तुम्हाला कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी काही ट्रिक सांगणार आहोत यामुळे कारल्याची भाजी अजिबात कडू होणार नाही.
ALSO READ: मशरूमचा वास दूर करण्यासाठी या ट्रिक अवलंबवा
1.कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी त्याची साल सोलणे सर्वात महत्वाचे आहे. कारल्याची सर्व खरखरीत साल काढून टाका. त्यात सर्वात जास्त कडूपणा असतो.

2.कारल्याची कडूपणा निघुनजाण्यासाठी त्यात मीठ घालून ते थोडा वेळ बाजूला ठेवा, यामुळे कारल्याचा कडूपणा दूर होईल. मिठामध्ये असलेले खनिजे कारल्याचा कडू रस काढून टाकतात.  

3.कारले कापताना त्याच्या सर्व बिया काढून टाका. कारल्याच्या बिया देखील कडू असतात. कारले चिरतांना सुरीच्या मदतीने त्यामधील बिया काढून टाका.   
 ALSO READ: या भाज्यांमध्ये चुकूनही टोमॅटो घालू नये, चव बिघडू शकते<> 4.कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी तुम्ही दही देखील वापरू शकता. यासाठी कारल्याचे छोटे तुकडे करा आणि ते दह्यात किमान एक तास ठेवा. यामुळे कारल्याचा कडूपणा निघून जाईल.  
ALSO READ: सुके अंजीर ताजे ठेवण्यासाठी या ट्रिक अवलंबवा
5.जर तुम्ही सुक्या कारल्याची भाजी बनवत असाल तर त्यात कांदा आणि बडीशेप वापरा. यामुळे भाजीतील कडूपणा निघून जाईल.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik<>

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अकबर-बिरबलची कहाणी : तीन रुपये, तीन गोष्टी

डिनर मध्ये बनवा चविष्ट हिरव्या मुगाची भाजी, जाणून घ्या रेसिपी

Besan Dosa कुरकुरीत बेसन डोसा रेसिपी

हिवाळ्यात बाहेर फिरायला जाता येत नसेल, तर घरी इन्फिनिटी वॉकचा प्रयत्न करा. आकृती 8 मध्ये चालण्याचे फायदे जाणून घ्या

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

पुढील लेख
Show comments