suvichar

Useful kitchen tips काही उपयोगी किचन टिप्स

Webdunia
शुक्रवार, 16 जून 2023 (22:31 IST)
छोटे छोटे मोहरे बरेचदा मोठा काम करतात. स्वयंपाकघरात बहुपयोगी ठरणार्‍या स्मार्ट टिप्सचे ही असेच आहे. स्वयंपाक झटपट आणि स्वादिष्ट व्हावा, जिन्नस टिकून राहावेत, त्यांचा पुरेपुर वापर व्हावा यासाठी या टिप्स नक्कीच मार्गदर्शक ठरतील. 
आले : आले स्वच्छ करून फ्रिजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते. तसेच सहज चिरता वा किसता येते. 
 
अंडे : अंडे उकडण्यापूर्वी पिनेने त्याच्या कवचावर अगदी लहान से छिद्र करा. उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल. 
 
ऑम्लेट : आम्लेट बनविताना मिश्रणात थोडे दूध घालून फेटा म्हणजे आम्लेट सॉफ्ट आणि स्व‍ादिष्ट बनते. 
 
आमरस : आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नयका. त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते. 
 
आले, लसूण, मिरची पेस्ट : आले, लसून मिरचीची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत एक चमचा गरम तेल घालून चांगले एकत्रीत करा. पेस्ट स्वादिष्ट होते. 
 
बदाम : बदामाची साले सहज निघा‍वीत यासाठी 15 ते 20 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा. 
 
बटाटा : बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

सोशल मीडियाच्या या क्षेत्रात उत्तम करिअर करा, जॉब व्याप्ती जाणून घ्या

डोक्याखाली उशी न घेता झोपलात तर त्वचेवर दिसेल कमाल बदल

उष्माघाताची सुरुवातीची लक्षणे अशी ओळखा, उपाय जाणून घ्या

शिर्षासनाचे फायदे आणि खबरदारी काय घ्यायची जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : जादुई विहिरी

पुढील लेख
Show comments