Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जोडीदाराच्या या 4 गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका,फसवणूक होऊ शकते

Webdunia
रविवार, 4 जुलै 2021 (09:15 IST)
असं म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा तिला काहीच सुचत नाही.त्याला सर्वकाही चांगले वाटू लागते.ते आपला जास्ती वेळ एकमेकांसह घालवतात.एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात,प्रत्येकाला आपल्या जोडीदाराविषयी काही अपेक्षा असतात.प्रत्येकाला असं वाटतं की त्यांना चांगला जोडीदार मिळाला पाहिजे.त्याने त्यांची काळजी घ्यावी. प्रामाणिक राहावं.प्रत्येक नातं हे विश्वासावर टिकून असतं.जर विश्वासाला तडा गेला तर नातं संपुष्टात येत. 
 
परंतु काही लोक प्रामाणिक असण्याचा देखावा करतात.आपल्या जोडीदारापासून बरंच काही लपवतात.त्यांच्या वर पारख ठेवतात.जर आपल्याला जोडीदारामध्ये या गोष्टी आढळल्या तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण या मुळे आपली फसवणूक होऊ शकते.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 मोबाईल फोन चेक करणे -जर आपला जोडीदार देखील वारंवार आपला मोबाईल फोन चेक करतो.तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.बऱ्याच लोकांची सवय असते की ते आपल्या जोडीदाराचा मोबाईल तपासून त्यांचे मेसेज वाचतात,कॉल डिटेल्स बघतात.वैयक्तिक फोटो आणि इतर गोष्टी बघतात.असे लोक संशयी असतात.
 
2 सोशल मीडियावर लक्ष ठेवतात- आजच्या युगात प्रत्येक जण सोशल मीडियावर आहे.अशा परिस्थितीत लोक सोशल मीडियावर बर्‍याच गोष्टी शेअर करत असतात. जर आपला जोडीदार आपल्या सोशल मीडियावर लक्ष ठेवत आहे आणि आपल्याकडून पासवर्ड मागत आहे किंवा आपल्या पोस्ट बद्दल काही कॉमेंट करत आहे तर हे आपल्यासाठी संकेत आहे की आपला जोडीदार चांगला व्यक्ती नाही.
 
3 वारंवार पैसे मागणे- गरजेसाठी कोणाची मदत करणे चांगले आहे परंतु जर आपला जोडीदार आपल्याकडून वारंवार पैशाची  मागणी करत असेल आणि नंतर पैसे देत नसेल किंवा पैसे परत देण्यास अनेक सबब सांगत असेल तर हे देखील जोडीदाराविषयी संशयास्पद असू शकतं.
 
4  माहिती लपवत असेल - कधीही एकमेकांशी काहीही लपवू नये.परंतु बरेच लोक आपल्या जोडीदाराशी आपली वैयक्तिक माहिती लपवतात.आपल्या बद्दल काहीच सांगत नाही.की ते काय काम करतात.ते कुठे राहतात,अशा काही माहिती ते जोडीदाराशी लपवतात.असे लोक विश्वासू नसतात.त्यांच्या पासून चार हात लांब राहणेच योग्य आहे. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

उपवास रेसिपी : बटाट्याची खीर

वजन कमी करण्यासाठी खोबरेल तेल खूप फायदेशीर आहे

Career Tips: : ज्वेलरी डिझायनिंग क्षेत्रात करिअर करा टिप्स जाणून घ्या

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

पुढील लेख
Show comments