Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Relationship tips :Tips To Impress Girl: मुलीला इम्प्रेस करायचे असेल तर या चार गोष्टी करणे टाळा

Webdunia
मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (22:11 IST)
कोणत्याही नात्यात बांधण्यासाठी एकमेकांना चांगले ओळखणे आवश्यक आहे. असे अनेकदा घडते की लोक नात्यात जुडतात. त्यांचे सुरुवातीचे दिवस आनंदात  जातात.  त्यांच्यात प्रेम वाढू लागते पण हळूहळू  जोडीदाराच्या अशा काही गोष्टी किंवा सवयी कळतात ज्या मुलींना अजिबात आवडत नाहीत.त्यामुळे आपसातील संबंध खराब होतात आणि ब्रेकअप होऊ शकते. असं होऊ नये या साठी या चार गोष्टी करणे टाळावे. जेणे करून मुलगी आपले प्रेम नाकारू नये. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 भांडण करणे आणि रागावणे -  ही बर्‍याच मुलांची सवय असते की ते खूप भांडतात. त्यांच्या नाकावर राग असतो. लहान सहान गोष्टींवर रागावणे, ओरडणे, बोलणे, मारहाण करण्याची त्यांना सवय असते. कॉलेज-ऑफिसमध्ये सर्वत्र त्यांच्या  रागीट स्वभावामुळे त्यांची प्रतिमा खराब होते.आणि अशा मुळे आपल्याला आवडत असलेल्या मुलीसमोर आपली प्रतिमा खराब होऊ शकते. त्यामुळे भांडण आणि मारहाणीची सवय असल्यास त्वरितच बदला. 
 
2 नशा करणे -अनेकदा मुले धूम्रपान करतात. सिगारेट व्यतिरिक्त ते दारूचे सेवन करतात. बहुतेक मुलींना नशा करणारे मुले आवडत नाहीत. विशेषत: जर मुलांनी  तिच्यासमोर असे केले तर ती त्यांच्या पासून अंतर ठेवणे चांगले मानते. हीसवय  आपल्याला  प्रेमापासून दूर करू शकते. 
 
3 चुकीच्या शब्दांचा वापर - काही मुलांना वाईट सवय असते की ते असे शब्द वापरतात जे त्यांनी बोलू नयेत. शिवीगाळ केल्याने त्यांच्या लव्ह लाईफवर परिणाम होऊ शकतो. मुलींना गैरवर्तन करणाऱ्या मुलांपासून दूर राहणे आवडते. 
 
4 अस्वच्छता-अनेक पोरांची खोली नेहमीच अस्वच्छ असते. मुले धूळ, घाणेरडे कपडे आणि बूट विखुरलेले ठेवतात किंवा स्वतःला आणि घराला अस्वच्छ ठेवतात. त्यामुळे त्याचा लूकही खराब दिसतो. स्वच्छता न ठेवणारे मुले मुलींना आवडत नाहीत. 
 
 

संबंधित माहिती

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

पुरुषांसाठी या बिया खूप फायदेशीर, शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढवतात, खाण्याची योग्य पद्धत

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

रक्त लाल असून रक्तवाहिन्या निळ्या का दिसतात

प्रसिद्ध कथाकार मालती जोशी यांचे निधन

द्राक्षे कधी खाऊ नयेत? महत्तवाची माहिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments